शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

तामिळनाडूत सापडले प्राचीन संस्कृतीचे अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 5:19 AM

तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील वैगेई नदीच्या तीरावरील किळादी या लहानशा गावात करण्यात आलेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व २०० वर्षांच्या कालावधीतील म्हणजे २२०० वर्षांपूर्वीच्या प्रगत संस्कृतीचे अवशेष आढळले

मदुराई : तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील वैगेई नदीच्या तीरावरील किळादी या लहानशा गावात करण्यात आलेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व२०० वर्षांच्या कालावधीतील म्हणजे २२०० वर्षांपूर्वीच्या प्रगत संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. आर्किआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (एएसआय)ने केलेल्या उत्खननातून प्राचीन तामिळनाडूमध्ये संगम काळामध्ये वैगई नदीच्या तीरावर ही समृद्ध संस्कृती नांदत होती, असे स्पष्ट झाले आहे.मोहंजोदारो, हरप्पा या संस्कृतींचा शोध लागल्यानंतर आर्यांचीचसंस्कृती श्रेष्ठ असल्याचे सांगण्यातयेत होते. मात्र प्राचीन भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात द्रविड संस्कृतीचे अवशेष सापडल्याने आर्य येण्याआधीही येथीललोकांची संस्कृती अतिशय समृद्ध होती, हे यामुळे सिद्ध झाले आहे.तामिळनाडूतील तेन्नी, दिंडिगल, शिवगंगा, रामनाथपूरम, मदुराई या पाच जिल्ह्यांतून वाहणाऱ्या वैगई नदीच्या खोºयात जुन्या संस्कृतीच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी एएसआयने २९३ जागी उत्खनन सुरू केले होते. ते २0१३ च्या सुमारात सुरू झाले.किळादीमध्ये उत्खननाच्या पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी२0१७ मध्ये ख्रिस्तपूर्व २०० वर्षे कालावधीतील नागरी वस्तीचेअवशेष सापडले. तामिळनाडूमध्ये संगम काळापासून नागरी संस्कृती अस्तित्वात होती, याचा हा आजवर सापडलेला सर्वात मोठा व सबळ पुरावा आहे.किळादी येथे विटांनी बांधलेल्या घरांचे अवशेष व १३ पायºयाअसलेली विहीरही सापडली. मातीच्या भांड्यांची ७२ खापरे मिळाली आहेत. त्यावर तामिळलिपीत मजकूर लिहिलेला आहे.त्यात इयानन, उदिरन, वेंदन, संतनावती, सतान अशी काही तामिळ नावे लिहिलेली आढळून आली. किळादी येथे आता वस्तुसंग्रहालय स्थापन होण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मात्र हा निर्णयकेंद्र सरकारच्या अख्यतारीत आहे, असे एएसआयच्या चेन्नई विभागाचे अधीक्षक ए. एम. व्ही. सुब्रमणयम यांनी सांगितले. किळादीप्रमाणेच श्रीलंकेमध्येही अशा संस्कृतीचे अवशेष उत्खननात मिळाले आहेत.किळादीतील उत्खननाच्या तिसºया टप्प्यासाठी केंद्र सरकारने ४० लाख रुपयेही मंजूर केले होते. मात्र अचानक हे उत्खनन करणारे एएसआयचे अधिकारी के. अमरनाथ रामकृष्ण यांची गुवाहाटी येथे बदली केली.मग उत्खनन सुरू ठेवण्यासाठी मंजुरी मिळण्यास विलंब होऊ लागला. त्यास तामिळनाडूतील राजकीय पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला. द्रविडी संस्कृतीचे महान स्वरूप सर्वांसमोर येऊ नये म्हणून केंद्र सरकार उत्खननात अडथळे आणत असल्याचा आरोपही करण्यात आला.