शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

५१ वर्षांपूर्वी कोसळलेल्या विमानाचे सापडले अवशेष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 5:26 AM

चंदीगड : हिमाचल प्रदेशच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये ५१ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ मालवाहू विमानाचे अवशेष लष्कराच्या डोग्रा ...

चंदीगड : हिमाचल प्रदेशच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये ५१ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ मालवाहू विमानाचे अवशेष लष्कराच्या डोग्रा स्काऊट््स तुकडीने यशस्वीपणे शोधून काढले आहेत. त्या विमानातील सर्व १०२ व्यक्ती ठार झाल्या होत्या.हे विमान ७ फेब्रुवारी १९६८ रोजी चंदिगढला परत येत असता रोहतांग खिंडीजवळ बेपत्ता झाले होते. विमानात लष्कराच्या ९० जवानांसह इतर लोक होते. लष्कराच्या पश्चिम कमांडने या विमानाचे व मृतांचे अवशेष शोधण्यासाठी २६ जुलै रोजी मोहीम हाती घेतली होती.पश्चिम कमांडने रविवारी एका प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर केले की, सलग १३ दिवस अथक शोध घेतल्यानंतर ५,२४० मीटर उंचीवर ढाका हिमनदीच्या क्षेत्रात एअरो इंजिन, वायरी, इलेक्ट्रिक सर्किट््स, पंखे, इंधन टाकीचे भाग, ब्रेकची यंत्रणा व कॉकपिटचा दरवाजा असे विमानाचे अवशेष शोधून काढण्यात आले. याखेरीज विमानातील जवानांच्या काही व्यक्तिगत वस्तूही सापडल्या.भविष्यात संदर्भांसाठी उपयोगी पडावेत यासाठी शोध घेतलेल्या व वस्तू मिलालेल्या जागांचे नेमके नकाशे तयार करण्यात आले आहेत. पायी गेलेल्या डोग्रा स्काऊट््सच्या शोध तुकडीला मदत करण्यासाठी हवाई दलही ६ आॅगस्टपासून सोध मोहिमेत सामिल झाले होते.ज्या भागात हे विमान कोसळले होते तेथे कित्येक वर्षांच्या हिमस्खलनाने बर्फाचे मोठे थर साजलेले होते व आताही तेथे सतत बर्फाच्या दरडी कोसळत असतात. शिवाय पातळ बर्फाच्या थराने झाकलेल्या फसव्या आणि घातक दऱ्याही बºयाच असल्याने त्या ठिकाणी पोहोचणे हेच मोठे खडतर काम होते. (वृत्तसंस्था)कुटुंबियांच्या आशा पल्लवित- हे विमान अचानक बेपत्ता झाले तेव्हा ते नाईलाजाने शत्रूच्या प्रदेशात उतरले असावे व त्यातील सर्वांना कैद केले गेले असावे, असा समज निर्माण झालो होता.परंतु सन २००३ मध्ये गिर्यारोहकांच्या एका हिमनदीपाशी त्या विमानातील एका जवानाचे ओळखपत्र योगायोगाने सापडले आणि विमान गायब होण्याच्या रहस्याचा उलगडा झाला.- आपल्या स्वजनांची निदान पार्थिवे तरी अंत्यसंस्कारांसाठी मिळतील, अशा कुटुंबियांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यानंतर अपघातातील मृतदेह परत आणण्यासाठी अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. पण आत्तापर्यंत फक्त पाच मृतदेह मिळू शकले अहेत.

टॅग्स :airplaneविमान