नवी दिल्ली : पंजाबपासून दूर राहण्यास सांगितल्यामुळेच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला, असे भाजपचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. प्रतिकूल परिस्थितीत आपण पक्षाला साथ दिली; मात्र काही लोकांच्या स्वार्थासाठी मला माझी नाळच तोडून टाकण्यास सांगितले जात आहे; मात्र काहीही होवो आपण पंजाब सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, या माजी क्रिकेटपटूने भावी रणनीतीचे पत्ते उघड केले नाहीत. तुम्ही पंजाबपासून दूर राहा, असे मला सांगण्यात आले.त्यामुळे मी राज्यसभेचा राजीनामा दिला. ज्यांनी मला चार वेळा निवडून दिले त्यांना मी कसे विसरू शकतो. चार वेळा जिंकून दिल्यानंतर मला राज्यसभेवर घेतले आणि नंतर सिद्धू तुम्ही पंजाबपासून दूर राहा, असे मला सांगण्यात आले. या कारस्थानामागे काही स्वार्थी लोकांचा हात आहे, असे ते म्हणाले; मात्र त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. कोणी असे एकदाही सहन करणार नाही; मात्र माझ्यासोबत असे होण्याची ही तिसरी-चौथी वेळ आहे. एककाळ असा होता की, उत्तर भारतातील ५० लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेला मी एकटाच भाजपचा खासदार होतो; मात्र जेव्हा मोदीसाहेबांची लाट आली तेव्हा विरोधक तर, बुडालेच सिद्धूलाही बुडविण्यात आले. सिद्धू यांना अमृतसरऐवजी कुरुक्षेत्र किंवा पश्चिम दिल्ली येथून निवडणूक लढण्यास सांगण्यात आले होते; मात्र त्यांनी ते मान्य केले नाही. (वृत्तसंस्था)...खता क्या हैआपल्या शायराना अंदाजमध्ये सिद्धू यांनी पक्षाला मी गुन्हा काय केला, असा सवाल केला. सिद्धू म्हणाले, ‘उन्हें ये फिक्र हैं हरदम नई तर्जेजफा क्या हैं. हमें ये शौक हंै देखें सितम की इंतेहा क्या हैं. गुनाहगारों में शामिल हैं गुनाह से नहीं वाकिफ, सितम करते हैं वो खुदा जाने खता क्या हैं.’
पंजाबपासून दूर केल्याने राजीनामा
By admin | Published: July 26, 2016 1:37 AM