नवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घालणाºया जीवघेण्या ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेमबाबतच्या सर्व लिंक तातडीने काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया साइट्सना दिले आहेत. इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून या गेमची किंवा त्यासंबंधित असलेली लिंक तातडीने हटवावी, असे पत्र इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि याहू यासारख्या वेबसाइट्सना पाठविले आहे.ब्ल्यू व्हेल चॅलेंजमुळे भारतात अनेक ठिकाणी मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई आणि पश्चिम बंगालमध्येही अशा घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. त्यामुळे या गेमवर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरत होती.२०१३ साली रशियात फिलिप ब्यूडेइकिन व त्याच्या साथीदारांनी ब्ल्यू व्हेल चॅलेंज डेव्हलप केले. ब्ल्यू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अॅडमिनिस्ट्रेटर आहे. आॅर्डर देणारी व्यक्ती अज्ञात असते. एकदा या खेळात लॉग इन केले की तो वेगवेगळे चॅलेंज देतो. साधारणत: ५0 टप्पे ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेने होते. शेवटी खेळणाºयाला आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.>पालकांनो हे कराच...मुले कोणता गेम खेळतात,याकडे लक्ष द्या.त्यांच्याशी संवाद साधा, समजून घ्या.मुला-मुलींना ओरडण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवा.मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली कोणतीही गोष्ट करण्यापासून रोखा.चांगले आणि वाईट काय, हेत्यांच्या भाषेत सांगा.>ब्ल्यू व्हेल चॅलेंज टास्क : हातावर ब्लेडने ब्ल्यू व्हेलचे चित्र रेखाटणे, हाताच्या नसा कापणे, ओठांवर ब्लेडने कापणे, पहाटे एखाद्या उंच ठिकाणी जाणे, पहाटे उठून हातावर वार करणे, हॉरर चित्रपट पाहणे, गच्चीवरून उडी मारणे>या हॅशटॅग्सपासून सावध राहा‘दी ब्ल्यू व्हेल चॅलेंज’पासून वाचण्यासाठी #curatorfindme #iamawhale #thebluewhale #wakemeupat420 या हॅशटॅग्सपासून लांबच राहा.
ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या सर्व लिंक काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 5:42 AM