गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटविल्यानंतर विजय रुपाणी यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, मात्र, त्यांची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता खूप कमी आहे. रुपाणी यांना राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचे संकेत मिळू लागले आहेत. यासाठी एकमेव असलेला रस्ता म्हणजे राज्यपाल पद. आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजुला करून रुपाणी यांची वर्णी लावण्यात आली होती. आनंदीबेन यांनी देखील संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतू त्यांचीही पूर्ण झाली नव्हती. (Vijay Rupani may became state governor. )
आनंदीबेन यांना देखील रुपाणी यांनी राज्याच्या राजकारणातून हटविल्याची चर्चा होत होती. आनंदीबेन राज्याच्या राजकारणात सक्रीय राहिल्या तर रुपाणींना अडचणीचे ठरण्याची शक्यता होती. राजकारणात एखाद्या मुख्यमंत्र्याला त्याच्या इच्छेविरोधात हटविले तर त्याच्या उत्तराधिकाऱ्याला काम करणे एवढे सोपे नसते. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक वर्ष दीड वर्षावर येऊन ठेपली आहे. यामुळे एवढ्या संवेदनशील काळात रुपाणी यांना राज्याच्या राजकारणात सक्रीय ठेवणे भाजपाला परवडणारे नाही.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडीयुराप्पांनी राज्यपाल पदाची ऑफर धुडकावली होती. मात्र, रुपाणी यांच्यात तेवढे धाडस नाही. येडयुराप्पांच्या बाबत जी भीती भाजपाला होती, तेच घडत आहे. येडीयुराप्पा राज्यात आपली यात्रा सुरु करत आहेत. अशाप्रकारच्या यात्रांपासूनचा राजकीय लाभ आणि कुरघोडी कोणापासून लपलेली नाही.
विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यामागे एक कारण असेही बोलले जात आहे की, ते जातीय समिकरणात फिट बसत नव्हते. राज्यात पाटीदारांचे वर्चस्व आहे. रुपाणी हे पाटीदार नाहीत, 2016 मध्ये त्यांना जेव्हा मुख्यमंत्रीपद दिले गेले तेव्हा एक प्रयोग म्हणून त्याकडे पाहिले गेले. 2017 मध्ये जवळपास भाजपाने बहुतांशी जागा काठावर जिंकल्या. यामुळे 2022 मध्ये कोणतीही रिस्क नको, म्हणून रुपाणी यांना बाजुला करण्यात आले आहे. यामुळे हरियाणामध्ये जाट नेते जास्त खूश झाले आहेत.