हैदराबादचं नाव बदलण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा... ; काँग्रेसचा भाजपाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 01:24 PM2018-11-09T13:24:11+5:302018-11-09T13:25:05+5:30
शहरांच्या नामांतर मुद्यावरुन भाजपा आणि विरोधक आमने सामने आले आहेत. आता हैदराबादच्या नामांतरचा मुद्दा चर्चेत आहे.
नवी दिल्ली - शहरांच्या नामांतर मुद्यावरुन भाजपा आणि विरोधक आमने सामने आले आहेत. आता हैदराबादच्या नामांतरचा मुद्दा चर्चेत आहे. तेलंगणामध्येभाजपा सत्तेत आली तर हैदराबाद व अन्य शहरांची नावं बदलून थोर व्यक्तींची नावं देण्यात येतील, असे विधान भाजपा नेते राजा सिंग यांनी दिले आहे. यावरुन काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी राजा सिंग यांना इशारा दिला आहे.
काय म्हणाल्या आहेत रेणुका चौधरी?
डायलॉगबाजी केल्यानं जनतेची मतं मिळतील, असे वाटतंय. हैदराबादी असल्याचं आम्ही गर्वानं सांगतो. हे कोण आहेत नामांतर करणारे. स्वतःचं नाव बदला. शहराचं नाव, आमची ओळख, हे सर्व बदलण्याचा प्रयत्न करतील ना तर सिंगजी यांच्यासमोर खूप अडचणी निर्माण होतील, अशा शब्दांत रेणुका चौधरी यांनी इशारा दिला आहे.
#WATCH Congress leader Renuka Chaudhary responds to BJP Hyderabad MLA Raja Singh's demand to change the city's name to Bhagyanagar. Chaudhary says 'We are proud Hyderabadis, Who is Raja Singh? He should go and change his name instead, no one will object' pic.twitter.com/VrqUYFqZ6l
— ANI (@ANI) November 9, 2018
राजा सिंग यांचं आश्वासन
''तेलंगणामध्ये भाजपा सत्तेत आली तर आम्ही सर्वप्रथम विकासाला प्राधान्य देऊ आणि दुसरे शहरांचे नामांतर करण्यात येईल. शहरांना थोर व्यक्तींची नावं असली पाहिजेत. ज्यांनी देशासाठी व समाजासाठी लढा दिलाय, अशा थोरांची नावं शहरांना द्यायला हवीत'',असे विधान राजा सिंग यांनी केले आहे.