नवी दिल्ली - शहरांच्या नामांतर मुद्यावरुन भाजपा आणि विरोधक आमने सामने आले आहेत. आता हैदराबादच्या नामांतरचा मुद्दा चर्चेत आहे. तेलंगणामध्येभाजपा सत्तेत आली तर हैदराबाद व अन्य शहरांची नावं बदलून थोर व्यक्तींची नावं देण्यात येतील, असे विधान भाजपा नेते राजा सिंग यांनी दिले आहे. यावरुन काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी राजा सिंग यांना इशारा दिला आहे.
काय म्हणाल्या आहेत रेणुका चौधरी?डायलॉगबाजी केल्यानं जनतेची मतं मिळतील, असे वाटतंय. हैदराबादी असल्याचं आम्ही गर्वानं सांगतो. हे कोण आहेत नामांतर करणारे. स्वतःचं नाव बदला. शहराचं नाव, आमची ओळख, हे सर्व बदलण्याचा प्रयत्न करतील ना तर सिंगजी यांच्यासमोर खूप अडचणी निर्माण होतील, अशा शब्दांत रेणुका चौधरी यांनी इशारा दिला आहे.
राजा सिंग यांचं आश्वासन''तेलंगणामध्ये भाजपा सत्तेत आली तर आम्ही सर्वप्रथम विकासाला प्राधान्य देऊ आणि दुसरे शहरांचे नामांतर करण्यात येईल. शहरांना थोर व्यक्तींची नावं असली पाहिजेत. ज्यांनी देशासाठी व समाजासाठी लढा दिलाय, अशा थोरांची नावं शहरांना द्यायला हवीत'',असे विधान राजा सिंग यांनी केले आहे.