तिरुची - नुकतीच केरळ येथील माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असताना आता एका भयानक घटना सोमवारी तिरुचि येथील जीयापुरमजवळ घडली आहे. केरळ येथे गरोदर हत्तीणीचा अननसातून फटाके देऊन जीव घेतला. ही अमानुष आणि निर्दयी घटना ताजी असताना स्फोटकांचा वापर करून एका कोल्ह्याला मारणाऱ्या १२ नरिकुरवार जमातीच्या लोकांना वनविभागाने अटक केली आहे. वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मांसाच्या आत देशी बनावटी बॉम्ब (स्फोटकं) भरून कोल्ह्याला खाण्यास दिले. त्यानंतर देशी बनावटी बॉम्ब कोल्ह्याच्या तोंडात फुटल्याने कोल्ह्याच्या मृत्यू झाला.केरळमध्ये स्फोटकांचा वापर करून गरोदर हत्तीणीच्या हत्येचा आक्रोश अद्याप संपलेला नाही. देशभरात या घटनेमुळे संतापाची लाट उसळलेली असताना तिरुची येथे पुन्हा तशीच घटना उघडकीस आली आहे, ज्यात नरिकुरवारांच्या गटाने मांसामध्ये स्फोटके भरुन एका कोल्ह्याची हत्या केली. काही उपद्रवी लोकांचा गट गावात मधाच्या शोधात गेला होता. परत येताना त्यांना एक कोल्हा सभोवताली फिरताना दिसला. म्हणून त्याची शिकार कारण्यासाठी आरोपींनी देशी बनावटी बॉम्बचा वापर केला आणि बॉम्ब तोंडात फुटल्याने जबडा रक्तबंबाळ झाला," अशी माहिती एका वनअधिकाऱ्याने दिली.
ही घटना उघडकीस येताच पोलिसांना एका पोत्यात जनावराच्या मृतदेहासह स्टॉलवर चहा पिताना काही लोकांचा समूह आढळून आला. "जीयापुरम पोलीस ठाण्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलने एका चहाच्या स्टॉलवरील नरिकुरवारांचा समूहाच शोध घेतला. त्यांची संशयास्पद वागणूक पाहून त्याने त्यांच्याकडे चौकशी केली. प्राथमिक चौकशीत पोलिसांना आढळले की, त्यांनी कोल्ह्याची शिकार केली. नंतर माहिती पुढे आमच्याकडे देण्यात आली, अशी माहित वन अधिकारी यांनी दिली.अटक केलेल्या 12 जणांमध्ये रामराज (21), सारावनन (25), येसुदास (34), सारथकुमार (28), देवदास (41), पांडियन (31), विजयकुमार (38), सत्यमूर्ती (36), सारथकुमार (26), राजामणिकम (70) राजू (45) पातमपल्ली (78) हे असून सर्व आरोपी तिरुवेरंबूर जवळील पुलानकुडी कॉलनी येथे राहणारे आहेत. आरोपींच्या अटकेनंतर वन अधिकाऱ्यांनी त्यांच्या ताब्यातील देशी बनावटीचे बॉम्ब हस्तगत केले आणि ते बॉम्ब कशासाठी आणले होते, या संदर्भात अधिक तपास केला जात आहे.
मन विषण्ण करणारी घटना; पाण्याच्या टाकीत 13 माकडं मृतावस्थेत, विषप्रयोगाचा संशय
खळबळजनक! ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंड करत होता एक्स गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडीओ व्हायरल
हृदयद्रावक! अन्नाच्या शोधात मानवी वसाहतीनजीक गेला हत्ती; वीजेच्या तारांनी घेतला जीव