शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

कुष्ठरुग्णांना पक्षपाती वागणूक देणारे कालबाह्य कायदे बदला

By admin | Published: April 07, 2015 11:14 PM

कुष्ठरोगाने कायमची विद्रुपता येत असली तरी वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे आता हा रोग पूर्णपणे बरा होतो व तो संसर्गजन्यही राहिलेला नाही

नवी दिल्ली : कुष्ठरोगाने कायमची विद्रुपता येत असली तरी वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे आता हा रोग पूर्णपणे बरा होतो व तो संसर्गजन्यही राहिलेला नाही हे वास्तव लक्षात घेऊन कुष्ठरोग्यांना पक्षपाती वागणूक देणारे अद्यापही लागू असलेले कायदे सरकारने बदलावेत, अशी शिफारस केंद्रीय विधि आयोगाने केली आहे. यासोबतच कुष्ठरोग्यांच्या पक्षपाताचे निर्मूलन होण्यासाठी केल्या जाऊ शकणाऱ्या नव्या आदर्श कायद्याच्या विधेयकाचा मसुदाही आयोगाने सादर केला आहे.सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. अजित प्रकाश शहा यांच्या अध्यक्षतेखालील विधि आयोगाने कायदा आणि कुष्ठरोग्यांच्या बाबतीत होणारा पक्षपात या विषयावरील आपला २५६ वा अहवाल मंगळवारी सादर केला. आज कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा रोग असला तरी कुष्ठरोग्यांना बहिष्कृतासारखी दिली जाणारी वागणूक हा त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यातील मुख्य अडथळा आहे. शिवाय आज लागू असलेल्या अनेक कायद्यांमध्ये कुष्ठरोग्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पक्षपाती वागणूक देणाऱ्या तरतुदी कायम आहेत, असे आयोगाने अहवालात नमूद केले आहे.वर्ष २०१४ मध्ये जगातील सर्वाधिक म्हणजे ५८ टक्के कुष्ठरोगी भारतात आढळले होते. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मिशन अंतर्गत २००५ ते २०१४ या काळात दरवर्षी १.२५ ते १.३५लाख या दराने नव्या कुष्ठरोग्यांची नोंद झाली आहे. यात लहान मुलांची संख्या जास्त असून त्यांना इतरांकडून बालवयापासूनच नकोसेपणाची वागणूक सहन करावी लागते.विधि आयोग म्हणतो की, जगभरात कुष्ठरोग्यांप्रती पक्षपात दूर करण्याचा निर्धार करणारा ठराव संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत २०१० मध्ये करण्यात आला. शिवाय २००७ मध्ये अपंगांना समान वागणूक देण्याविषयीचा आंतरराष्ट्रीय करारही संयुक्त राष्ट्रांत झाला आहे. या दोन्हींमध्ये भारत सहभागी आहे. त्यामुळे कुष्ठरोग्यांना समान हक्क देणे हे भारताचे कर्तव्य ठरते. परंतु भारत सरकारने त्यासाठी काही केलेले नाही.विद्यमान कायद्यांमध्ये करायच्या दुरुस्त्या सुचविताना आयोग म्हणतो की, हिंदू विवाह कायदा, १९५५; मुस्लिम विवाह विच्छेदन कायदा, १९३९; सुधारित भारतीय घटस्फोट कायदा, १८६९; विशेष विवाह कायदा, १९५४ व हिंदू दत्तकविधान व पोटगी कायदा, १९५६ या कायद्यांमध्ये पती किंवा पत्नी यापैकी एकाला कुष्ठरोग झाला असले तर त्याआधारे दुसऱ्याला घटस्फोट किंवा काडीमोड घेता येईल, अशा तरतुदी आजही कायम आहेत. वस्तुत: हे कायदे केले गेले तेव्हा कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग होता. त्यामुळे वैवाहिक संबंधातूनच संसर्ग होऊन रोगाचा प्रसार होऊ नये या उद्देशाने अशा तरतुदी केल्या गेल्या होत्या. परंतु आता तशी परिस्थिती नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)