गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाण्यावर फेस दिसला होता. या फेस घालविण्यासाठी दिल्ली जलबोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एँटी फॉगिंग केमिकलचा वापर केला होता. यावरून भाजपाचे खासदार प्रवेश सिंह वर्मा यांनी यमुनेच्या किनारी जात या अधिकाऱ्यांना अत्यंत वाईट भाषेत सुनावले होते. छट पूजेला येणाऱ्या लोकांना विषारी केमिकल मिश्रित पाण्यात अंघोळ करायला लावली जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
यावेळी हे पाणी पिऊन दाखव, अंघोळ करून दाखवा, असे आव्हानही अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. यावर अधिकाऱ्यांनी या केमिकलला अमेरिकेच्या एफडीए, केंद्र सरकारची परवानगी असल्याचे पत्र या अधिकाऱ्याने दाखविले होते. तरीही खासदार ऐकायला तयार नव्हते. या दोघांमध्ये वाद पहायला मिळाला होता. आज दिल्ली जलबोर्डाचे संचालक संजय शर्मा यांनी यमुनेच्या त्यात पाण्याने अंघोळ केली. मिडीयाच्या कॅमेरांसमोर यमुनेचे पाणी गोळा करण्यात आले. ते पाणी एका मोठ्या पिंपात घेऊन मगद्वारे अंगावर घेत त्यांनी अंघोळ केली. यमुनेचे पाणी अंघोळीच्या लायक असल्याचे त्यांनी दाखविले.
तत्पूर्वी शर्मा यांनी कालिंदी कुंज पोलीस ठाण्यात प्रवेश सिंह वर्मा यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. यामध्ये वर्मा यांनी आपल्यासोबत गैरव्यवहार केला. अभद्र भाषेत वाद घातला, तसेच यमुनेच्या पाण्यात मी विष टाकत असल्याचा अपप्रचारही केला. अँटी फोमिंग केमिकलला डीजेबीची मंजुरी आहे, केंद्रीय मंत्रालयाची देखील मंजुरी आणि स्वच्छ गंगा मिशन अंतर्गत शिफारसही आहे. वर्मा आणि बग्गा यांच्यासह काही लोकांनी आपल्या कामात अडथळा आणला आणि धमक्या दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
भाजप खासदारांचा व्हिडीओ...