नवी दिल्ली :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी राज्य सरकारने पाठविलेला अहवाल अर्थवट असून, विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयाेगाने राज्याचे मुख्य सचिव आलापन बंडाेपाध्याय यांना दिले आहे. (The report of the alleged attack on Mamata is incomplete)ममता बॅनर्जी यांच्या पायाला १० मार्चला प्रचारादरम्यान दुखापत झाली हाेती. त्यावेळी नंदीग्राममध्ये बिरुलिया बाजार येथे माेठा जमाव ममता बॅनर्जींकडे चालून गेला हाेता. हा अपघात नसून घातपात असल्याचा आराेप ममता बॅनर्जी यांनी केला हाेता. याबाबत राज्य सरकारकडून निवडणूक आयाेगाने अहवाल मागितला हाेता. ही घटना नेमकी कशी घडली आणि यामागे काेण असावेत, याबाबत सविस्तर माहिती आयाेगाने मागविली आहे. निवडणूक आयाेगातील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. सरकारने सादर केलेला अहवाल अर्धवट असून, पुरेशी माहिती त्यात नसल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. अहवालात माेठ्या जमावाचा उल्लेख आहे. मात्र, संबंधित चार-पाच जणांचा उल्लेख नाही. तसेच या घटनेचा स्पष्ट व्हिडीओदेखील नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील कथित हल्ल्याचा अहवाल अर्धवट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 4:26 AM