धार्मिक स्थळांबाबत त्वरीत अहवाल द्या मनपा: आयुक्तांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
By admin | Published: February 29, 2016 10:02 PM
जळगाव: अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईबाबत कालमर्यादा ठरवून दिलेली असल्याने २००९ पूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या निष्कासन अथवा नियमितीकरणाबाबत कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, लोकमान्यता याबाबींसंदर्भात अहवाल त्वरीत सादर करावा, असे पत्र मनपा आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
जळगाव: अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईबाबत कालमर्यादा ठरवून दिलेली असल्याने २००९ पूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या निष्कासन अथवा नियमितीकरणाबाबत कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, लोकमान्यता याबाबींसंदर्भात अहवाल त्वरीत सादर करावा, असे पत्र मनपा आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे. सवार्ेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने २९ सप्टेंबर २००९ पूर्वी जी अनधिकृत धार्मिक स्थळे होती, ती स्थलांतरीत करणे शक्य असल्यास अथवा कायम करणे शक्य असल्यास त्याबाबत कार्यवाही करण्याचे तसेच अन्य धार्मिक स्थळे तसेच २००९ नंतरची धार्मिक स्थळे निष्कासीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने मनपाने २००९ पूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांची यादीच पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविली असून त्यातील कोणती धार्मिक स्थळे कायम करणे शक्य आहे? अथवा कोणती निष्कासीत करावी लागतील? यासंदर्भात कायदा व सुव्यवस्था, वाहतूकीवर परिणाम होतो का? लोकमान्यता आहे का? आदी बाबींचा अहवाल मनपाला देणे शासन निर्णयानुसार आवश्यक आहे. मात्र मनपाने यादी पाठवूनही दरवेळी पोलिसांकडून बंदोबस्ताबाबतच माहिती दिली जात आहे. त्यामुळे आयुक्तांनी पुन्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून वरील मुद्यांवर तातडीने अहवाल द्यावा, अशी विनंती केली आहे.