नवी दिल्ली - राज्यसभा निवडणुकीत विजयी ठरलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निवडीला आव्हान देणारी भाजप नेत्याची याचिका फेटाळण्यासाठी पटेल यांनी केलेल्या याचिकेवर फेरनिर्णय द्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाला बुधवारी दिला.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. गेल्यावर्षी राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांनी भाजप नेते बलवंतसिंह राजपूत यांना पराभूत केले होते.काँग्रेसचे दोन बंडखोर आमदार भोलाभाई गोहिल, राघवभाई पटेल यांची मते निवडणूक आयोगाने अवैध ठरविल्याने निवडणुकीत उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेल्या किमान मतांची मर्यादा ४५ वरून ४४ झाली होती. ही दोन मते मोजली गेली असती, तर आपण जिंकलो असतो, असा दावा राजपूत यांनी केलाआहे.
अहमद पटेल यांच्या याचिकेवर फेरनिर्णय द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 4:47 AM