शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कडक बंदोबस्त, 71 डीसीपी आणि 213 एसीपींसह 27 हजार जवान तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 3:17 PM

Republic Day 2022: संपूर्ण सोहळ्याचे विहंगम दृश्य दाखवण्यासाठी दोन '360 डिग्री कॅमेरे' बसवण्यात आले आहेत. यातील एक कॅमेरा राजपथावर आणि दुसरा इंडिया गेटच्या वर बसवण्यात आला आहे.

नवी दिल्लीप्रजासत्ताक दिन परेड 2022 (Republic Day Parade 2022) दरम्यान, दिल्लीने छावणीचे रुप धारण केले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पहारा ठेवण्यासाठी संपूर्ण दिल्लीत 27 हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच संपूर्ण परेडच्या 360 डिग्री कव्हरेजचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक प्रसारक दूरदर्शन 59 कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रजासत्ताक दिनाचे थेट प्रक्षेपण करेल.

चोवीस तास पहारा

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय राजधानीत सुरक्षेसाठी 27 हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले असून दहशतवादविरोधी यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त (डीसीपी), सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) आणि निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सशस्त्र पोलीस दल आणि कमांडो, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे अधिकारी आणि जवानही तैनात करण्यात आले आहेत.

मोठ्या अधिकाऱ्यांची तैनाती

प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अस्थाना यांनी सांगितले की, परेडच्या सुरक्षेसाठी 71 डीसीपी, 213 एसीपी आणि 753 निरीक्षकांसह दिल्ली पोलिसांचे 27,723 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 65 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत, दिल्ली पोलिसांनी इतर सुरक्षा एजन्सींच्या समन्वयाने दहशतवादविरोधी उपाययोजना अधिक मजबूत केल्या आहेत.

नागरिकांना थेट प्रक्षेपण पाहायला मिळेलदेशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे भारतीय हवाई दलाच्या (IAF) 75 विमानांद्वारे विविध कलाकृती दाखवल्या जाणार आहेत. तसेच, फ्लाय-पास्टचे नवीन पैलूदेखील थेट प्रदर्शनात पाहायला मिळतील. यासाठी सरकारकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शनने नॅशनल स्टेडियम, राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवन दरम्यानच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. याशिवाय, लोकांना संपूर्ण सोहळ्याचे विहंगम दृश्य देण्यासाठी दोन '360 डिग्री कॅमेरे' बसवण्यात आले आहेत. यातील एक कॅमेरा राजपथावर आणि दुसरा इंडिया गेटच्या वर बसवण्यात आला आहे.

राजपथावर 59 कॅमेरे

यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या कव्हरेजसाठी 160 हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दूरदर्शनने राजपथवर 59 कॅमेरे बसवले आहेत. मंत्रालयाने सांगितले की, राजपथ, राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट येथे 33 कॅमेरे, नॅशनल स्टेडियमवर 16 कॅमेरे आणि राष्ट्रपती भवन येथे 10 कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे संपूर्ण कव्हरेज 'डार्क फायबर ऑप्टिकल कनेक्टिव्हिटी', 'सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी' आणि 'बॅकपॅक कनेक्टिव्हिटी'द्वारे सर्व प्रमुख स्थानांना जोडून एकत्रित केले गेले आहे.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनdelhiदिल्ली