चंदिगढ : पाच हजार वर्षांपूर्वी हडप्पा संस्कृती अस्तित्वात येण्याआधी भारतीय उपखंडात आणखी एक संस्कृती नांदत होती. त्या संस्कृतीचे संशोधन करण्यासाठी हरयाणातील फतेहबाद जिल्ह्याच्या कुणाल या गावी नव्याने पुरातत्त्व विभागाने उत्खननाला सुरुवात झाली आहे.कुणाल येथे या आधी १९८६ साली उत्खनन झाले होते, पण कालांतराने त्यामध्ये खंड पडला. मात्र, येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या उत्खननाची सुरुवात नॅशनल म्युझियमचे महासंचालक बी. आर. मणी, हरयाणा पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय खात्याचे उपसंचालक बनानी भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत करण्यात आला. इंडियन आर्किआॅलॉजिकल सोसायटी, हरयाणा पुरातत्त्व खात्याचे पुरातत्त्व तज्ज्ञांचा सहभाग आहे. कुणाल येथे नव्याने उत्खनन करण्यासंदर्भात हरयाणा पुरातत्त्व विभाग व आयएएस यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.कुणाल येथील उत्खननात ज्या गोष्टी सापडतील, त्यामुळे हडप्पापूर्व संस्कृतीवर अधिक प्रकाश पडू शकेल. या संस्कृतीतील रहिवासी चिखलमातीपासून बनविलेल्या विटांनी आपली घरे बांधत असत. त्यांची घरे आयताकृती किंवा चौकोनी असत. या प्राचीन घरांचे, तसेच त्या वेळच्या वापरातील वस्तूंचे अजून काही अवशेषही नव्याने सुरू केलेल्या उत्खननात मिळण्याची शक्यता आहे.>सापडले सोन्याचे मणीया आधी कुणाल येथे जे उत्खनन झाले, त्यामध्ये एका नेकलेसमधील सहा सोन्याचे मणी, बाजूबंद, बांगड्यांचे तुकडे अशा अनेक प्राचीन वस्तू सापडल्या होत्या. त्यावरून या हडप्पापूर्व संस्कृतीत समृद्धी नांदत होती, या निष्कर्षाप्रत पुरातत्त्वशास्त्रज्ञ आले, तसेच काही जुन्या मुद्राही तिथे सापडल्या होत्या. अशा प्रकारच्या भारतात प्राचीन काळी बनत होत्या, हे कुणालमधील आधीच्या उत्खननातून उजेडात आले होते.
हडप्पापूर्व संस्कृतीचे हरयाणात संशोधन, ५ हजार वर्षांपूर्वी होती समृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 4:23 AM