शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

येणाऱ्या पंधरवड्यात रुग्णसंख्येचा कळस, तिसऱ्या लाटेबाबत संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 10:21 AM

त्याआधी ७ ते १३ जानेवारी या कालावधीत तिचे प्रमाण २.२ टक्के, १ ते ६ जानेवारी या कालावधीत आर व्हॅल्यूचे प्रमाण ४ व २५ ते ३१ डिसेंबर या काळात २.९ होते.

नवी दिल्ली : येत्या पंधरवड्यात कोरोनाची तिसरी लाट कळस गाठण्याची शक्यता असल्याचे आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी म्हटले आहे. देशात संसर्ग प्रसाराचे प्रमाण (आर-व्हॅल्यू) १४ ते २१ जानेवारी या कालावधीत १.५७ पर्यंत कमी झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

संसर्ग प्रसाराबाबत आयआयटी मद्रासचा गणित विभाग व सेंटर फॉर एक्सलन्स फॉर कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स यांनी संयुक्तरीत्या अभ्यास केला. प्रा. नीलेश उपाध्ये व प्रा. एस. सुंदर यांचे त्यासाठी संशोधकांना मार्गदर्शन लाभले आहे. याच्या प्राथमिक निष्कर्षात म्हटले आहे की, १४ ते २१ जानेवारी या कालावधीत आर-व्हॅल्यू १.५७ होती. त्याआधी ७ ते १३ जानेवारी या कालावधीत तिचे प्रमाण २.२ टक्के, १ ते ६ जानेवारी या कालावधीत आर व्हॅल्यूचे प्रमाण ४ व २५ ते ३१ डिसेंबर या काळात २.९ होते.

आर-व्हॅल्यूचे ही मुंबईमध्ये ०.६७, दिल्लीमध्ये ०.९८, चेन्नईमध्ये १.२, कोलकातामध्ये ०.५६ आहे. आयआयटी मद्रासच्या गणित विभागातील सहायक प्राध्यापक डाॅ. जयंत ओझा यांनी सांगितले की, मुंबई, कोलकातामध्ये आर व्हॅल्यूने याआधीच कळस गाठला असून, त्याचे प्रमाण ओसरत आहे, तर दिल्ली, चेन्नईमध्ये आर-व्हॅल्यूही १ च्या जवळपास आहे. 

उपराष्ट्रपतींना दुसऱ्यांदा बाधाउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना दुसऱ्यांदा कोरोना संसर्गाची बाधा झाली. सध्या ते हैदराबादमध्ये असून, आठवडाभर विलगीकरणात राहतील. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व विलगीकरणात राहावे, असे आवाहन नायडू यांनी केले आहे. बाधेमुळे ते प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहाण्याची शक्यता कमी आहे.

डॉक्टरांना जाणवतोय थकवाn कोरोनाच्या साथीने देशातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. n डॉक्टरही अहोरात्र कार्यरत असून, त्यातील अनेक जण बाधित झाले. n या सर्व गोष्टींमुळे डॉक्टरांनाही आता मानसिक, शारीरिक थकवा जाणवत आहे, असे दिल्लीच्या डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर