कर्नाटकात आरक्षणाची मागणी, लिंगायत समाजाचा विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 19:30 IST2024-12-10T19:29:42+5:302024-12-10T19:30:00+5:30

यावेळी आंदोलकांनी सुरक्षा कडे तोडून विधानसभेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. येथे सोमवारपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे.

Reservation demand, lingayat community protest over quota demand police lathi charge in karnataka | कर्नाटकात आरक्षणाची मागणी, लिंगायत समाजाचा विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीचार्ज

कर्नाटकात आरक्षणाची मागणी, लिंगायत समाजाचा विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीचार्ज

आरक्षणाच्या मागणीवरून लिंगायत पंचमसाली समाजाच्या वतीने कर्नाटकातील बेळगाव येथे मंगळवारी (10 डिसेंबर 2024) निदर्शन करण्यात आले. समाजाचे धर्मिक प्रमुख बसवजय मृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सुरक्षा कडे तोडून विधानसभेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. येथे सोमवारपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे.

आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर मोर्चा काढून विधानसभेला घेराव घालू, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. यानंतर, पोलिसांनी विरोधीपक्षातील काही भाजप आमदारांना ताब्यात घेतले होते. तसेच, मृत्युंजय स्वामी तसेच त्यांच्या अनेक समर्थकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

लाठीचार्जचे व्हिडिओ सोशल मीडियावर -
या लाठीचार्जचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात फाटलेल्या चपलांपासून ते इतर गोष्टींपर्यंत सर्व काही रस्त्यावर विखुरलेले दिसत असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार वादावादी होतानाही दिसत आहे. लाठीचार्ज दरम्यान एका आंदोलकाच्या डोक्यातून रक्त आले, त्याच्या पांढरा शर्ट देखील रक्ताने माखला होता. पोलीस त्याला अटक करणार होते, मात्र, इतर लोकांनी त्याला घेरले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत सरकारी वाहने आणि आमदारांच्या वाहनांचेही नुकसान केले आहे.

"चर्चेसाठी बोलावले होते, पण.." -
या चकमकीसंदर्भात बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ते म्हणाले, पंचमसाली समाजाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ते आले नाहीत. लोकशाहीत लढण्याचा अधिकार आहे आणि आम्ही लढण्याच्या अधिकाराला विरोध करत नाही.”


 

Web Title: Reservation demand, lingayat community protest over quota demand police lathi charge in karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.