मुंबई, दि. 20 - नेहमीच उलट-सुलट विधाने करुन चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केले आहे. भारतीय सैन्यात अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी)ला आरक्षण द्यायला हवे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय लष्करात एससी आणि एसटीला आरक्षण देण्यात यावे यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यावर चर्चा केली आहे. काल एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आठवले यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या देशात सेवा करायला हवी. आठवले यांनी भारतीय तरुणांनी लष्करात भरती होऊन देशसेवेत आपलं योगदान देण्याची विनंतीही केली.अनुसूचित जाती जमातींना क्रिकेटमध्ये 25 टक्के आरक्षण द्या - रामदास आठवलेदरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर आठवले यांनी या सामन्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी क्रिकेटमध्येही अनुसूचित जाती-जमातीला 25 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. इतका बलवान संघ अंतिम फेरीत 180 धावांनी पराभूत कसा होतो ? असा सवाल त्यांनी विचारला.वंदे मातरम् बोलण्यास नकार देण्यात काहीच गैर नाही - रामदास आठवलेजर एखादी व्यक्ती वंदे मातरम् बोलण्यास नकार देत असेल तर त्यात काहीच गैर नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलले आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने 'वंदे मातरम्'चा मुद्या जाणुनबुजून उपस्थित केला जात असल्याचा आरोपही यावेळी रामदास आठवले यांनी केला आहे. महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 'प्रत्येकाने वंदे मातरम् बोललं पाहिजे, पण जर एखादी व्यक्ती नाही बोलली तर त्यात चुकीचं काय ?', असा प्रश्न रामदास आठवले यांनी यावेळी उपस्थित केला. 'कोणी वंदे मातरम् बोलण्यास नकार देत असेल तर त्यात काहीच चुकीचं नाही', असं मत रामदास आठवले यांनी मांडलं.
अनुसूचित जाती जमातींना भारतीय लष्करात आरक्षण द्या - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 9:07 AM