शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल? शिंदे गटाचाही समावेश होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 12:15 PM

नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी : शिंदे गटाचाही समावेश होण्याची शक्यता

हरीश गुप्ता  लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच त्यांच्या ७७ सदस्यीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी त्यांची वॉर टीम निवडणार आहेत. भाजपाने संघटनात्मक परिवर्तन केले आहेत आणि २०१९ मध्ये विजय मिळवू न शकलेल्या १४४ लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारांचा विजय निश्चित करण्याचे काम पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. लवकरच राज्यपालांचेही परिवर्तन होऊ शकते, असे संकेत आहेत. 

मध्य प्रदेशात नवा चेहरा देऊन शिवराजसिंह चौहान यांना दिल्लीला बोलाविण्याचा विचार मोदी करत आहेत. त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या अनुभवाचा गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उपयोग केला जाऊ शकतो. मंत्रिमंडळात मुस्लिमांना प्रतिनिधित्व न दिल्याने चुकीचा संदेश गेलेला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिद आणि मदराशांना भेटी दिल्याची घटनाही अलीकडेच घडली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ११ राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे कठीण काम मोदींपुढे आहे. 

...तर ‘त्या’ मंत्र्यांना  बाहेरचा रस्ता महत्त्वाची मंत्रालये पाहणाऱ्या काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही, त्यामुळे त्यांचे विभाग बदलले जाऊ शकतात किंवा त्यांना बाहेरचा दरवाजा दाखविला जाऊ शकतो. शिवसेनेच्या शिंदे गटालाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. जनता दल युनायटेड आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मंत्रिमंडळातून यापूर्वीच बाहेर पडलेली आहे. भाजपाला बिहारमध्ये रणनीती पुन्हा आखावी लागणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा