वीज खंडीत झाल्याने म्हसावद ग्रामस्थांचा रास्तारोको
By admin | Published: August 23, 2016 12:48 AM
जळगाव : रात्री १० वाजता वीजपुरवठा खंडीत झाल्याने म्हसावद ता.जळगाव येथे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १०.३० वाजता एरंडोल-नेरी या मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. सुमारे ५०० ते ६०० ग्रामस्थ रस्त्यावर बसले. यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अर्धा तास रास्ता रोको आंदोलन सुरू होते. अधिकार्यांना आणा, ठोस आश्वासन द्या, नंतर आंदोलन मागे घ्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. काही ग्रामस्थांनी दगडही भिरकावले. परंतु कुठले नुकसान झाले नाही, असा खुलासा म्हसावद दूरक्षेत्र पोलिसातील उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी यांनी दिली. नंतर पोलिसांनी वीज कंपनीच्या अधिकार्यांना आंदोलनस्थळी आणावे लागले. शिरसोली व रामदेववाडी यादरम्यानच्या हाय टेंशन वाहिनीत बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे अधिकार्यांनी सांगितले.