शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
2
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
3
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
4
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून खास शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
5
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
6
Ganesh Visarjan 2024 Live: गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
7
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
8
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
9
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
10
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
11
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
12
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
13
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
14
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
15
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
16
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
17
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
18
दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य...
19
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट
20
टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात

राजीनाम्यावर राजीनामे! थोड्याच वेळात नायाब सिंह सैनी राजीनामा देणार, हरियाणा विधानसभा भंग करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 3:32 PM

Nayab Singh Saini will resign: उमेदवारांची पहिली यादी येताच धडाधड सुरु झालेले राजीनाम्याचे सत्र दुसरी यादी आली तरी सुरुच आहे. यामुळे भाजपा कधी नव्हे त्या मोठ्या पेचात सापडली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारावेळी हरियाणात मोठी घडामोड घडत आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी राजीनामा देणार असून विधानसभा भंग केली जाण्याची शक्यता आहे. आज हरियाणा कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीत विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

उमेदवारांची पहिली यादी येताच धडाधड सुरु झालेले राजीनाम्याचे सत्र दुसरी यादी आली तरी सुरुच आहे. यामुळे भाजपा कधी नव्हे त्या मोठ्या पेचात सापडली आहे. आतापर्यंत ९० हून अधिक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. याचा दबाव असतानाच भाजपावर विधानसभा भंग करण्याची नामुष्की ओढविली आहे. 

सरकार बनल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभेचे अधिवेशन बोलवायचे असते. ही मुदत १२ सप्टेंबर म्हणजे उद्याच संपत आहे. नियमांनुसार संविधानिक संकट टाळण्यासाठी गुरुवारी अधिवेशन बोलविणे किंवा विधानसभा भंग करणे एवढेच पर्याय सैनी सरकारसमोर उरलेले आहेत. विधानसभा भंग केल्यानंतरही सैनी काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. 

नेमका पेच काय? हरियाणा विधानसभेचे शेवटचे अधिवेशन १३ मार्च रोजी बोलावण्यात आले होते. घटनेनुसार हे अधिवेशन सहा महिन्यांतून एकदा बोलविण्याचे आवश्यक असते. सैनी सरकारने 12 सप्टेंबरपर्यंत सभागृहाची बैठक बोलावणे आवश्यक होते. परंतू, हे अधिवेशन काही बोलविण्यात आले नाही. पावसाळी अधिवेशनही घेतले गेले नाही. अशा परिस्थितीत हे घटनात्मक संकट टाळण्यासाठी सैनी यांना विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे पाठवावी लागणार आहे. राज्यघटनेच्या कलम १७४ (१) मध्ये सहा महिन्यांची अट आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा