शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

"मेट्रो मॅन"ला द्यायचा होता राजीनामा,पण आदित्यनाथांनी सोपवली दुहेरी जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 3:58 PM

कामाच्या ताणातून सुटका करण्यासाठी 85 वर्षीय इ श्रीधरन यांनी गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 21 - कामाच्या ताणातून सुटका करण्यासाठी 85 वर्षीय इ श्रीधरन यांनी गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांनी लखनऊ आणि कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या सल्लागाराच्या भूमिकेतून आपल्याला मुक्त करावे, अशी मागणी केली. मात्र, झालं याचं नेमकं उलटं.  राजीनामा घेणं दूरच योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर आणखी एका कामाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर श्रीधरन कोच्ची परतले. कोच्ची येथे परतल्यानंतर डीएमआरसी कार्यालयात श्रीधरन यांनी याबाबत माहिती दिली.
 
मी तुम्हाला राजीनामा देण्याची परवानगी नाही देणार, या उलट तुम्हाला वाराणसी, आग्रा, मेरठ आणि गोरखपूर येथील जबाबदारी देण्यात येत आहे, असे सांगून त्यांना परत पाठवले. श्रीधरन अनेक वर्षांपासून मेट्रोसाठी काम करत आहेत. त्यामुळे मेट्रो मॅन अशीही त्यांची ओळख आहे. उत्तर प्रदेशच्या मेट्रो योजनेबाबत बोलताना श्रीधरन म्हणाले, कानपूर डेपो तयार आहे. त्याचबरोबर वाराणसी मेट्रो योजनेचा अहवाल तयार आहे. पण यामध्ये काही बदल करावे लागतील.गोरखपूर, आग्रा आणि मेरठ येथे मेट्रोसाठी सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. लखनऊ येथे 10.5 किमी पहिला टप्प्यातील मेट्रो तयार आहे. आता फक्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी त्याची पाहणी करणे राहिले आहे.
 
कोण आहेत श्रीधरन-
दिल्लीच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतीकारक बदल घडवणारे म्हणून इ.श्रीधरन यांची ओळख आहे. इ.श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची धूरा 1995 साली हाती घेतली, तेव्हा मेट्रो रेल्वे उभारणीचं आव्हान अशक्यप्राय कोटीतलं होतं. ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं. मेट्रोच्या उभारणीपूर्वी दिल्लीत प्रवास करणं हे एक दिव्य होतं आणि तिथे ब्ल्यु लाईन नावाच्या बसेस या रोज होणाऱ्या अपघातांसाठी कुप्रसिध्द होत्या. दिल्लीतील रस्त्यांवरील रहदारी आणि वाहतूक कोंडीने प्रवाशांचे अतोनात हाल होत असत, आज मेट्रोमुळे प्रवास सुसह्य झाला आहे. श्रीधरन यांनी अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने काटेकोरपणे मेट्रोची उभारणी करुन दाखवली. सरकारी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं. श्रीधरन हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्सच्या 1981 सालच्या बॅचचे अधिकारी आहेत. 
(शिवाजी महाराज खरे हिरो, बाबर, अकबर घुसखोर - योगी आदित्यनाथ)
(EVM म्हणजे एव्हरी वोट फॉर मोदी - योगी आदित्यनाथ)
(केवळ "गोमाता की जय" म्हटल्याने त्या वाचणार नाहीत - योगी आदित्यनाथ)