रायपूर : शांतता, ऐक्य आणि सलोखा राखण्याचे आवाहन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परस्परांच्या परंपरांचा आदर करा, परस्परांबद्दल आदरभावाचा अभाव राहिल्यास विकासात बाधा निर्माण होते, असे सुचविले आहे. अहिष्णुतेवरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.भारत हा वैविध्यपूर्ण देश असून तीच त्याची मोठी शक्ती आहे. सलोखा हीही आपली ताकद आहे, असे ते राष्ट्रीय युवा महोत्सवाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना म्हणाले. आमचे सरकार देशाच्या विकासासाठी काम करीत आहे. सलोखा न राखता आपलेपणाची भावना न ठेवल्यास प्रगती शक्य नाही.