थॅलेसिमिया, सिकलसेल तपासणी शिबिराला प्रतिसाद
By admin | Published: October 21, 2016 12:18 AM
()
()नागपूर : थॅलेसिमिया आणि सिकलसेल सेंटर नागपूरतर्फे जरीपटका येथील डॉ. विंकी रुघवानी चाईल्ड केअर सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये थॅलेसिमिया आणि सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला थॅलेसिमिया, सिकलसेल संेटरचे संचालक डॉ. विंकी रुघवानी, थॅलेसिमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप मोटवानी, रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थचे राजेश कृपलानी, मधु रुघवानी, पंकज रुघवानी, थदाराम तोलानी, गिरीश साधवानी उपस्थित होते. डॉ विंकी रुघवानी यांनी थॅलेसिमिया आणि सिकलसेल या आजाराबाबत माहिती देताना हे आजार अनुवंशिक असून आईवडिलांपासून मुलांना होत असल्याचे सांगितले. प्रत्येक युवक-युवतीने तसेच गर्भवती महिलेने थॅलेसिमिया आणि सिकलसेल आजाराची तपासणी करण्याचे आवाहन केले. प्रताप मोटवानी यांनी शिबिराचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घेण्याचे आवाहन केले. यावेळी राजेश कृपलानी, थदाराम तोलानी यांनीही आपले विचार व्यक्त केले. संचालन निधी रुघवानी यांनी केले. यशस्वितेसाठी डॉ. राकेश कृपलानी, डॉ. जयप्रकाश दिपानी, संदीप पमनानी, विक्की दात्रे, राहुल गजभिये यांनी परिश्रम घेतले.