धावता दौरा : पाच मिनिटांत आटोपले भाषणत्र्यंबकेश्वर : अनादी काळापासून सुरू असलेल्या धर्माच्या प्राचीन परंपरांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे तशीच ती सर्वांची आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले.कुशावर्तनजीक उभारलेल्या छोटेखानी सभामंडपात सिंहस्थाची सांगता ध्वजावतरणाने करण्यात आल्यानंतर छोटेखानी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सिंहस्थात चांगली कामगिरी करणार्या प्रशासनातील अधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अमित शाह बोलत होते. अमित शाह पुढे म्हणाले की, गुरू आणि सिंहाने कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर हा सोहळा झाला. संतांचा आणि सिंहस्थाचा आशीर्वाद असल्याने यंदाच्या मोसमात दमदार पाऊस झाला. महाराष्ट्रातही दमदार पाऊस झाल्याने दुष्काळ दूर झाला आहे. सिंहस्थासारख्या प्राचीन परंपरेचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. कुंभमेळा हा श्रद्धेचा महापूर आहे. आज त्र्यंबकराजाच्या पावन कुशीत सिंहस्थाची सांगता होत आहे. पुढील सिंहस्थ यापेक्षा चांगला होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय अन्न व उद्योग प्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार महेश गिरी, अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज, षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत सागरानंद सरस्वती, महामंत्री महंत हरिगिरीजी महाराज, महंत बिंदू महाराज, नगराध्यक्ष विजया ला, डॉ. प्रशांत पाटील, ललित लोहगावकर, धनंजय तुंगार, संतोष कदम, जयंत शिखरे, अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रांत बाळासाहेब वाघचौरे, त्र्यंबकेश्वर नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी चेतना केरूरे आदि उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)फोटो कॅप्शन- त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे सिंहस्थ ध्वजावतरणाप्रसंगी गंगापूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरी महाराज, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच ब्रावृंद.
परंपरांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची : अमित शाह
By admin | Published: August 12, 2016 12:05 AM