नवी दिल्लीः शीख समुदायातील लोकांना रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये प्रवेश दिला जात नसल्याच्या बऱ्याचशा घटना परदेशात घडत असतात. परंतु आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही असे प्रकार समोर आले आहेत. दिल्लीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये शीख फॅशन डिझायनरला प्रवेश करण्यास मनाई केली आहे.परम साहिब नावाच्या एका फॅशन डिझायनरच्या धर्म आणि पेहरावावर रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं आक्षेप घेत प्रवेश नाकारला आहे. त्यानंतर परम यानं याची माहिती स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली. पाहता पाहताच त्यांची पोस्ट व्हायरल झाली. या विषयावरून गदारोळ झाल्यानंतर रेस्टॉरंट मालकाचे झोपेतून डोळे उघडले आणि त्यानंतर त्यानं माफी मागितली. त्याचबरोबर आरोपी मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. मी सरदार असल्यानंच मला प्रवेश दिला नाहीपरमनं स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सांगितलं की, मला आणि माझ्या मित्रांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश दिला नाही. कारण मी सरदार आहे. माझी दाढी, पेहरावावर रेस्टॉरंट मॅनेजरला आक्षेप होता. त्याचदरम्यान काऊंटरवरील एकानं परमबरोबर असलेल्या महिलेशी छेडछाडही केली. काऊंटरवरच्या मॅनेजरनं सांगितलं की, आम्ही शीख लोकांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देत नाही.
धक्कादायक! दाढी अन् पगडी घातल्यानं शीख तरुणाला मॅनेजरनं Restaurantमध्ये दिला नाही प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 5:39 PM
शीख समुदायातील लोकांना रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये प्रवेश दिला जात नसल्याच्या बऱ्याचशा घटना परदेशात घडत असतात.
ठळक मुद्देदिल्लीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये शीख फॅशन डिझायनरला प्रवेश करण्यास मनाई केली आहे. परम साहिब नावाच्या एका फॅशन डिझायनरच्या धर्म आणि पेहरावावर रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं आक्षेप घेत प्रवेश नाकारला मी सरदार असल्यानंच मला प्रवेश दिला नाही