शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 5:15 AM

स्थानबद्धतेनंतर प्रथमच दिली मुलाखत : नॅशनल कॉन्फरन्स नेते फारुख अब्दुल्ला यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘विश्वासघात’ करून जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा हिरावून घेतल्याचा अरोप करीत सरकारने हा दर्जा पुन्हा बहाल करून काश्मिरी जनतेचा गमावलेला विश्वास पुन्हा जिंकावा, अशी आवाहनवजा आग्रही मागणी काश्मीरचे ज्येष्ठ नेते व ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये असलेला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलल्याला येत्या ५ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत डॉ. अब्दुल्ला यांनी हे आवाहन केले. काश्मीरच्या या दर्जा बदलानंतर १० महिने स्थानबद्ध केल्या गेलेल्या या ८२ वर्षांच्या नेत्याने सुटकेनंतर माध्यमांना दिलेली ही पहिलीच मुलाखत होती.अब्दुल्ला म्हणाले की, ज्या विश्वासाने काश्मीर भारतात विलीन झाले त्याचा तो विश्वास केंद्र सरकारच्या या निर्णयाने पार धुळीला मिळाला आहे. केंद्र सरकारला काश्मिरी जनतेचा विश्वास पुन्हा जिंकावाच लागेल व तो जिंकण्यासाठी अन्याय्य पद्धतीने हिरावून घेतलेला राज्याचा दर्जा जम्मू-काश्मीरला पुन्हा बहाल करणे हाच एकमेव उपाय आहे.अब्दुल्ला म्हणाले की, अनुच्छेद ३७० रद्द केले की जम्मू-काश्मीरची भरभराट होईल, तेथील दहशतवाद संपुष्टात येईल, असे स्वप्न केंद्र सरकारने दाखविले; पण लोकांना विचाराल तर ते सांगतील की, दहशतवाद कमी होण्याऐवजी उलट आणखी वाढला आहे. खरे तर नवे काही मिळण्याऐवजी आम्ही होते तेही गमावून बसलो आहोत. नॅशनल कॉन्फरन्सने इतर अनेकांप्रमाणे केंद्र सरकारच्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे व न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असे ते म्हणाले.गौरवही हिरावून घेतल्याने काश्मीर हताशआधी दोन दशकांच्या दहशतवादाने काश्मीर पोळले आहे. आता कोरोना महामारीने लोक हैराण झाले आहेत. त्यातच आमचा गौरवही हिरावून घेतल्याने काश्मीर पार हताश झाले आहे. आम्ही हातात कधीही बंदूक घेतलेली नाही व यापुढेही घेणार नाही. एक राजकीय पक्ष म्हणून या अन्यायाविरुद्ध आम्ही सर्व सनदशीर मार्गांनी शेवटपर्यंत लढत राहू, असेही ते म्हणाले की,

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर