पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. यावेळी काही ठिकाणी हिंसाचार झाला होता. निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मतदान घेतले होते. याचे आज निकाल जाहीर झाले आहेत. हिंसाचारानंतर राज्यपालांनी अमित शाहंची भेट घेतली होती. यावेळी शाहंनी त्यांना लवकरच चांगले दिवस येतील असे आश्वासन दिले होते.
पश्चिम बंगालमध्ये अद्याप संपूर्ण निकाल लागलेले नाहीत. परंतू, ग्राम पंचायतचे बहुतांश निकाल हाती आले आहेत. या कलानुसार 63229 ग्राम पंचायतपैकी ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाला 15637 ग्राम पंचायती जिंकता आल्या आहेत. तर 2915 मध्ये आघाडीवर आहे. भाजपाला 3367 ग्राम पंचायतींमध्ये यश मिळाले आहे. 728 मध्ये आघाडीवर आहे. सीपीएमला 1196 ग्राम पंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. तर 491 ग्रा. पंचायतींमध्ये आघाडीवर आहे. काँग्रेसला 882 ग्रा. पंचायतींमध्ये विजय तर 255 मध्ये आघाडीवर आहे. इतरांना 1358 ग्राम पंचायती जिंकता आल्या आहेत. तर 300मध्ये आघाडीवर आहेत.
पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल अद्याप यायचे आहेत. 9730 पंचायत समित्यांपैकी १४९ पंचायत समित्यांचे निकाल आले आहेत. परंतू त्याचे गुणोत्तर पाहता टीएमसीच आघाडीवर दिसत आहे. टीएमसीने 58 पं. समित्यांवर विजय मिळविला आहे. तर ७६ ठिकाणी आघाडीवर आहे. भाजपा ८ ठिकाणी आघाडीवर आहे. सीपीएम सहा आणि इतर एका पंचायत समितीवर आघाडीवर आहेत.
928 जिल्हा परिषदांपैकी टीएमसीने आतापर्यंत १० जिल्हा परिषदांमध्ये आघाडी मिळविली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांचे निकाल अद्याप यायचे आहेत. याचे सर्व चित्र उद्या पर्यंत स्पष्ट होणार आहे.