नवी दिल्ली - त्रिपुराचा निकाला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणाचा विजय आहे. हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या जनतेचे आभार मानतो असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी निकालानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
ईशान्य भारतातील निवडणुकांचे हे निकाल 2019 मध्ये काय घडणार त्याचे संकेत आहेत. ईशान्येत मिळालेल्या विजयासह आता कर्नाटकातही आम्ही विजयासाठी जोरदार प्रयत्न करु असे अमित शहा यांनी सांगितले. आजच्या निकालाने लोकांना आता डावे आवडत नाहीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्रिपुरामध्ये भाजपाकडे स्पष्ट बहुमत असले तरी आम्ही आघाडीतील सहकारी पक्षालाही मंत्रिमंडळात स्थान देऊ असे शहा यांनी सांगितले.
आधी भाजपाला फक्त हिंदी भाषिक पट्टयापर्यंत मर्यादीत ठरवण्यात आले होते. पण आजच्या निकालाने हा समज चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहेत. आम्ही जो नारा दिला होता त्यानुसार त्रिपुराच्या जनतेने परिवर्तन घडवून दाखवले आहे असे शहा म्हणाले.