- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उन्हाळी सुट्टी असूनही सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घेतलेली ‘ट्रिपल तलाक’वरील सहा दिवसांची विशेष सुनावणी संपली असून न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला आहे. सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने ट्रिपल तलाकवर सुनावणी केली. यात केंद्र सरकार, आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, आॅल इंडिया मुस्लिम वूमेन पर्सनल लॉ बोर्ड यांनी आपली बाजू मांडली. दरम्यान, न्यायालयाने मुस्लिम संघटनांना विचारले की, ट्रिपल तलाक हा श्रद्धेचा विषय असू शकतो का? जर ते म्हणत असतील की, हा पितृसत्ताक, धर्मशास्त्रानुसार चुकीचा आहे. या घटनापीठात न्या. कुरियन जोसेफ, न्या. आर. एफ. नरीमन, न्या. यू. यू. ललित व न्या. अब्दुल नजीर यांचा सहभाग होता. ११ मे रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. यातील सदस्य हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी समुदायाचे होते. न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ते याची चौकशी करणार आहेत की, मुस्लिमांमधील प्रचलित प्रथा धर्माशी संबंधित मौलिक अधिकार आहे का? तसेच सध्या बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या मुद्यांवर विचार करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर नंतर विचार करण्यात येणार आहे. न्यायालयाने चिकित्सा करू नये -खुर्शिदन्यायालयाने म्हटले आहे की, खुर्शिद म्हणतात, हे पाप आहे. पापी प्रथा श्रद्धेचा विषय असू शकतो का? ट्रिपल तलाक १४०० वर्षांपासून चालू आहे. याचे उत्तर आहे, होय. तो पूर्ण जगात सुरू आहे का?. याचे उत्तर आहे, नाही. व्यवस्था स्वत:च सांगत आहे की, हा प्रकार चुकीचा आहे. खुर्शिद यांचे असे म्हणणे होते की, न्यायालयाने याची चिकित्सा करू नये.
‘ट्रिपल तलाक’चा निकाल राखीव
By admin | Published: May 19, 2017 1:55 AM