जोधपूर : कारगिल युद्धात (१९९९) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मिग-२७ या विमानांनी शुक्रवारी येथील विमानतळावरून आकाशात शेवटचे उड्डाण केले तेव्हा भारतीय हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा भावनात्मक क्षण होता. गेल्या तीनपेक्षा जास्त दशकांपासून मिग-२७ विमाने सेवेत होती. भारतीय हवाई दलाच्या जमिनीवरून हल्ला करणाºया ताफ्याचे स्विंग-विंग मिग-२७ विमाने ही कणा होती. ती येथील हवाईतळावरून भव्य समारंभात सेवेतून निवृत्त केली गेली.
या हवाईतळावर सात मिग-२७ विमानांचा शेवटचा‘स्कोर्पियन्स’ ताफा स्क्वॉड्रन नंबर २९ शी जोडलेला होता. शुक्रवारी या ताफ्याने शेवटचे उड्डाण केले. एअर मार्शल एस. के. घोटिया (एअर आॅफिसर कमांडिंग-इन- चीफ, साऊथ वेस्टर्न एअर कमांड) हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.