पलवल (हरयाणा) - लष्करातून निवृत्त झालेला कॅप्टन नरेश धनकड (४५) याने हरयाणातील पलवल शहरात मंगळवारी पहाटे दोन ते चार या वेळेत लोखंडी कांबेने सहा जणांची हत्या केली. धनकड हा मनोरुग्ण असावा, असे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनकड याने आग्रा चौक ते कॅम्प कॉलनी या दोन किलोमीटरच्या पट्ट्यात दाट धुक्याचा फायदा घेत हे हत्याकांड केले. खासगी रुग्णालयाच्या दुसºया मजल्यावर त्याने पहिला बळी घेतला व त्यानंतर त्याने पाच जणांना ठार मारून एकाला जखमी केले. धनकड हा वल्लभगढनजीक माछगरचा रहिवासी. धनकड हा १९९९ मध्ये लष्करात लेफ्टनंट म्हणून दाखल झाला व त्याने २००३ मध्ये वैद्यकीय कारणांवरून निवृत्ती घेतली.तो २००६ मध्ये हरयाणा कृषी विभागात सहायक विकास अधिकारी तर आरोग्य विभागात उपविभागीय अधिकारीही होता. त्याने सर्वात आधी अंजुम या महिलेची हत्या केली. ती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मदतनीस होती. ती दुसºया मजल्यावर झोपेत असताना धनकड तेथे आला. ही हत्या सीसीटीव्ही कॅमेºयात टिपली गेली असून त्याच्या हातात लोखंडी कांब सहजपणे दिसत आहे.नंतर तो आग्रा रस्त्यावर गेला व त्याने तीन जणांची हत्या केली. नंतर थोडे पुढे जाऊन त्याने दोघांना मारून टाकले. त्याला पकडण्यासाठीनाके तयार केले गेले. तो सातव्या बळीच्या शोधात असताना त्याला पकडले. (वृत्तसंस्था)पोलिसांवरही हल्लाखासगी रुग्णालयानजीक भटकत असताना धनकडला सकाळी सात वाजता अटक झाली. त्याने पोलिसांना यावेळी विरोध केला व त्याला जबरदस्तीने ताब्यात घेतले जाण्याआधी त्याने त्यांच्यावरही हल्ला केला.
निवृत्त कॅप्टनने केली सहा जणांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 1:15 AM