पाटणा - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. तब्बल 62 एन्काउंटर करणाऱ्या निवृत्त डीएसपीनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या सेवानिवृत्त डीएसपी के चंद्रा यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. स्वत:वर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली. के चंद्रा यांच्या नावावर पोलीस दलात 62 एन्काउंटर केल्याची नोंद आहे. के चंद्रा यांच्या आत्महत्येने अनेकांना धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांना घटनास्थळावर एक सुसाईड नोट देखील सापडल्याची माहिती मिळत आहे. के. चंद्रा हे खूप डिप्रेशनमध्ये होते. 16 वर्षांपासून ते यासाठी उपचारही घेत होते मात्र मानसिक आजारातून ते बरे होऊ शकले नाहीत. त्यामुळेच त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'मला डिप्रेशनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून झोप लागत नाही. हे दु: ख आता सहन होत नाही. त्यामुळे मी हे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. माझा मोबाईल नंबर सुरू ठेवा कारण घरातील सर्व महत्त्वाच्या कामांसाठी तो गरजेचा आहे. बँक, गॅस, वीज आणि आयकरसाठी तो महत्त्वाचा आहे' असं के चंद्रा यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. तसेच माझं पेन्शन बंद करून आईच्या नावानं सुरू करा असा सल्ला देखील त्यांनी आपल्या मुलांना दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : देशात कोरोनाचा धोका वाढला; धडकी भरवणाऱ्या आकडेवारीने पुन्हा रेकॉर्ड मोडला
CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा
"देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं आणि भोंगळ कारभार जबाबदार", सोनिया गांधींचा हल्लाबोल
Cyber Attack : बँक अलर्ट! SBI मध्ये अकाऊंट आहे?; मग अजिबात करू नका 'ही' चूक, वेळीच व्हा सावध