शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

'दंगेखोरांना रिटर्न गिफ्ट'; भाजप आमदारानं ट्विट केला यूपी पोलीसचा हा व्हायरल VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 8:13 PM

UP police Rioters Beaten Video: भाजप आमदार त्रिपाठी यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 30 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दोन पोलीस कर्मचारी एका गटाला काठीने मारताना दिसत आहेत.

उत्तर प्रदेशात शुक्रवारच्या नमाजनंतर मोठा हिंसाचार उसळला होता. यानंतर, आता पोलीस आरोपींचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढत आहेत. दंगलीतील आरोपींसोबत कठोरपणे वागा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना दिले आहेत. उत्तर प्रदेशात आरोपींना पकडण्याची जोरदार मोहीम सुरू आहे.

यातच, देवरियाचे भाजप आमदार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माजी माध्यम सल्लागार शलभ मणी त्रिपाठी यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत पोलीस दंगलीतील आरोपींना काठीने मारताना दिसत आहेत. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर, पोलिसांनी दंगेखोरांवर केलेल्या कारवाईला त्रिपाठी यांनी 'रिटर्न गिफ्ट', असे म्हटले आहे. व्हिडिओ ट्विट करताना, त्यानी 'दंगेखोरांना रिटर्न गिफ्ट', असे कॅप्शन दिले आहे.

भाजप आमदार त्रिपाठी यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 30 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दोन पोलीस कर्मचारी एका गटाला काठीने मारताना दिसत आहेत. त्रिपाठी यांनी पोलिसांच्या या कारवाईला 'रिटर्न गिफ्ट' म्हटल्याबद्दल अनेक पत्रकारांनी त्यांचा निषेध केला आहे. तर, अनेकांनी त्रिपाठी यांचे समर्थन करत, दंगेखोरांना रोखण्यासाठी पोलीस कारवाईची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

कपिल मिश्रा यांनीही केले ट्विट - भाजप नेते कपिल मिश्रा यांनी शलभ मणी त्रिपाठी यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. 'यूपी पोलीस रस्त्यावर जिहादींचा इलाज करत आहेत. तर शलभ मणी त्रिपाठी मीडियात बसलेल्या जिहादींचा इलाज कर आहेत,' असे मिश्रा यांनी म्हटले आहे. या हिंसाचारासंदर्भात यूपी पोलिसांनी आतापर्यंत आठ जिल्ह्यांतून 300 हून अधिक लोकांना अटक केली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा