ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 1 - दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौर प्रकरणाच्या वादात अभिनेते अनुपम खेर यांनी उडी घेतली आहे. गुरमेहर कौरला बलात्काराच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर विद्यापीठ आणि दिल्लीतील वातावरण भलतेच तापले आहे. सोशल मीडियावर याचे रणकंद सुरु झाले आहे. विरेंद्र सेहवाग, योगेश्वर दत्तर, विद्या बालन नंतर आता या वादात अनुपम खेर यांनी उडी घेत नव्या वादाला वळण दिले आहे. वेगळा मुद्दा घेऊन असहिष्णूतेची गँग परत आली आहे. त्यांच्या घोषणा वेगळ्या असल्या तरी चेहरे तेच आहेत असे एक ट्विट अनुपम खेर यांनी केले आहे. ट्विटवर हॅश-टॅग करताना त्यांनी #Intolerance #AwardWapsi #Emergency #DemonitisationDisaster #BharatKeTukde या शब्दांचा वापर केला आहे. आणखी एक ट्विट करताना त्यांनी देशभक्तीचा नारा लगवला आहे. देशभक्तीच्या प्रखर भावनेवर जितके प्रश्न उपस्थित केले जातात, तितकी देशभक्ती वाढत जाते, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. अनुपम खेर यांना भाजपच्या जवळचे मानले जातात. गेल्या वर्षी जेएनयूमधील संघर्षातही त्यांनी उडी घेतली होती. अनुपम खेर यांच्या पत्नी किरण या भाजपच्या खासदार आहेत.