नवी दिल्लीः निर्भया प्रकरणातला दोषी विनय शर्मा यानं शनिवारी राष्ट्रपतींना एक याचिका पाठवली. त्या याचिकेच्या माध्यमातून त्यानं गृहमंत्रालयाकडून करण्यात आलेली दया याचिका मागे घेण्याची विनंती केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं जी याचिका राष्ट्रपतींना पाठवली आहे, त्यात स्वाक्षरी नसून ती अधिकृत नाही, त्यामुळे राष्ट्रपतींनी ती परत पाठवावी. केंद्रीय गृहमंत्रालयानं निर्भया प्रकरणातला दोषी विनय शर्माची दया याचिका रद्द करण्याची शिफारस केलेली आहे. गृहमंत्रालयानं दया याचिकेची अंतिम फाइल निर्णयासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली आहे.दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतले उपराज्यपाल अनिल बैजल यांनी गृहमंत्रालयाचा एक रिपोर्ट पाठवला होता. ज्यात सांगण्यात आलं होतं की, दोषीला कोणत्याही परिस्थिती शिक्षा माफ करता येणार नाही. दिल्ली सरकारनंही विनयची याचिका फेटाळून लावली होती. 2012मध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीबरोबर दुष्कर्म आणि हत्या प्रकरणात दोषींपैकी विनयची शिक्षा माफ करण्याचा अर्ज करण्यात आला होता. आता याचिका फेटाळल्यानं विनयची फाशी निश्चित मानली जात आहे.
"माझी दया याचिका परत करा"; निर्भया प्रकरणातल्या दोषीची राष्ट्रपतींकडे विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 5:20 PM