शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

आणखी सात साहित्यिक पुरस्कार परत करणार

By admin | Published: October 12, 2015 10:53 PM

देशात धर्मांधतेच्या विषाचा केला जाणारा प्रसार आणि वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी सोमवारी आणखी सात अग्रणी लेखकांनी

नवी दिल्ली : देशात धर्मांधतेच्या विषाचा केला जाणारा प्रसार आणि वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी सोमवारी आणखी सात अग्रणी लेखकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची संख्या २१ वर पोहोचली आहे. दरम्यान, बुकर पुरस्कारप्राप्त लेखक सलमान रश्दी यांनीही पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांना समर्थन दिले आहे.रश्दी यांनी म्हटले आहे की, मी नयनतारा सहगल व अन्य लेखकांच्या विरोधाशी सहमत आहे. जवाहरलाल नेहरूंच्या ८८ वर्षीय भाची असलेल्या सहगल यांचा साहित्य अकादमी पुरस्कार परत केलेल्या पहिल्या तीन साहित्यिकांत समावेश आहे. सोमवारी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेणाऱ्या अग्रणी साहित्यिकांत काश्मिरी लेखक गुमाल नबी ख्याल, उर्दू कादंबरीकार रहमान अब्बास, कन्नड लेखक आणि अनुवादक श्रीनाथ डी.एन., हिंदी लेखक राजेश जोशी व मंगलेश डबराल, वरयाम संधू, जी. एन. रंगनाथ राव यांचा समावेश आहे. ख्याल यांनी म्हटले आहे की, देशातील अल्पसंख्यकांमध्ये असुरक्षितपणाची भावना निर्माण झाली आहे.दरम्यान, साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरूच असल्यावरून साहित्य अकादमीने २३ आॅक्टोबरला बैठक बोलावली आहे. अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी म्हटले आहे की, ही संस्था भारताच्या घटनेमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांशी बांधील आहे. उर्दू लेखक रहमान अब्बास यांनी म्हटले आहे की, दादरीच्या घटनेनंतर उर्दू लेखक समुदाय अत्यंत निराश झाला आहे. त्यामुळे मी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना त्यांची तिसरी कादंबरी ‘खुदा के साये में आंख मिचौली’साठी २०११ मध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. श्रीनाथ यांनी म्हटले आहे की, पेनच्या जागी आता गोळ्या चालवल्या जात आहेत. भीष्म साहनी यांच्या हिंदीतील लघुकथांचा कन्नडमध्ये अनुवाद केल्याबद्दल श्रीनाथ यांना २००९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.कलबुर्गी यांच्या हत्येबाबत अकादमीने पाळलेल्या मौनाचा विरोध करताना डबराल आणि जोशी यांनी म्हटले आहे की, मागील एक वर्षात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याचे स्वातंत्र्य या लोकशाही मूल्यांवर हिंदुत्ववादी शक्ती हल्ला करीत आहेत. ते कधीही स्वीकारार्ह नाही. दरम्यान, अकादमीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याबाबत अकादमीला माहिती दिलेली नाही, असे सांगितले. उदय प्रकाश, जी. एन. देवी, अमन सेठी, वारयाम सिंधू आणि जी. एन. रंगनाथ राव यांच्याशिवाय कोणत्याही लेखकाने माहिती दिलेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. लेखक, कवी आणि नाटककार असलेल्या राजेश जोशी यांना २००२ मध्ये ‘दो पंक्तियों के बीच’ या कलाकृतीसाठी अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी सांगितले की, अकादमीच्या अध्यक्षांना मी पत्र लिहिले असून, पुरस्काराची रक्कम लवकरच परत करणार आहे, अशी माहिती दिली आहे. देशात ज्या प्रकारे धर्मांधतेचे वातावरण पसरवले जात आहे, ते सहिष्णुतेच्या परंपरेला साजेसे नाही. आता साहित्यिकांनी परत केलेल्या पुरस्काराच्या रकमेचे काय करायचे, याचा निर्णय अकादमीने घ्यायचा आहे. यापूर्वी उदय प्रकाश, नयनतारा सहगल, अशोक वाजपेयी, गणेश देवी यांच्यासह इतर काहींनी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घोषित केलेला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)