इस्रायल-हमास संघर्षात इस्रायल सोडू इच्छिणाऱ्या १९७ भारतीय नागरिकांची तिसरे विमान शनिवारी एका विशेष विमानाने मायदेशी पोहोचली. तर चौथे विमान २७४ भारतीयांना घेऊन पोहोचले. इस्रायलमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांचे दिल्लीतील विमानतळावर केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी स्वागत केले. भारतीय नागरिकांचा हा गट भारतीय वेळेनुसार रात्री ८.१० वाजता इस्रायलहून निघाला. हे प्रवासी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिल्लीला पोहोचला. या दोन्ही विमानातून एकून ४७१ भारतीय प्रवासी दिल्लीत पोहोचले.
गाझाचे पाणी संपले! २० लाख लाेक संकटात; इस्रायलच्या रणगाड्यांची सीमेवर जमवाजमव
इस्रायलच्या शहरांवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन गाझामधून मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना १२ ऑक्टोबर रोजी 'ऑपरेशन अजय' अंतर्गत विशेष उड्डाणे सुरू करण्यात आली होती. या हल्ल्यांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 'एक्स' वर पोस्ट केले होते की, "ऑपरेशन अजय प्रगतीपथावर आहे. आणखी १९७ प्रवासी भारतात परतत आहेत. शनिवारी बेन गुरियन विमानतळावरून दोन विशेष उड्डाणे सुरू होतील, असे भारतीय दूतावासाने सांगितले होते. पहिले विमान स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५:४० वाजता निघाले. दुसरे फ्लाइट स्थानिक वेळेनुसार रात्री ११:०० वाजता नियोजित आहे आणि ३३० प्रवाशांना घेऊन जाऊ शकते.
दरम्यान, इस्रायलमधील भारतीय दूतावासाने 'एक्स' वर एख पोस्ट केली यात लिहिले, "जे भारतीय नागरिक अजूनही इस्रायलमध्ये आहेत आणि 'ऑपरेशन अजय'चा भाग म्हणून भारतात जाऊ इच्छितात त्यांनी त्वरीत फॉर्म भरावा." भारतीय दूतावासाने मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली, त्यात म्हटले आहे की, "प्रवाशांची 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर 'ऑपरेशन अजय' मध्ये जागेसाठी निवड केली जाईल." मात्र, सीट निश्चित झाल्यानंतर तुम्ही प्रवासास नकार दिल्यास, तुमचे नाव यादीच्या शेवटी टाकले जाईल.