शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
3
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
4
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
5
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
6
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
7
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
8
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
9
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
10
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
11
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
12
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
13
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
14
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
15
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
16
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
18
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
19
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
20
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा

24 तासात जवानाच्या हत्येचा घेतला बदला; 72 तासांत 12 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 3:19 PM

सुरक्षा दलाने 24 तासांत सैन्याच्या जवानाच्या हत्येचा बदला घेतला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी ही सर्व माहिती दिली आहे.

ठळक मुद्दे रविवारी सकाळी चकमकी पुन्हा सुरू झाल्या आणि त्यात दोन अतिरेकी ठार झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

श्रीनगर -  जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलांची कारवाई झपाट्याने सुरू असून 72 तासात सुरक्षा दलांनी खोऱ्यातील 12 अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. इतकेच नव्हे तर शनिवारी भारतीय लष्कर प्रांतातील लष्कराच्या जवानाला ठार करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा देखील करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने 24 तासात सैन्याच्या जवानाच्या हत्येचा बदला घेतला आहे. जम्मू-काश्मीरपोलिसांचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी ही सर्व माहिती दिली आहे.जम्मू-काश्मीरचे पोलिस डीजीपी दिलबाग सिंह यांच्या मते,  बिजबेहारामध्ये  दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी सुरू केलेले ऑपरेशन संपले आहे, ते म्हणाले की, १२ तासांत दहशतवाद्यांविरूद्ध वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत १२ दहशतवादी ठार झाले. ७ दहशतवादी त्राल आणि सोपिया येथे मारले गेले. दहशतवादी संघटना अल बद्रचे 3 दहशतवादी हरिपोरामध्ये मारले गेले आहेत आणि आता बिजबेहारामध्ये लश्करचे २ दहशतवादी ठार झाले आहेत.“दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा भागात सेमथन येथे झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले.” एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने तेथे घेराव घालत शोध मोहिम राबविली. त्यानंतर ते म्हणाले, शनिवारी चकमकीला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत चकमकी सुरू राहिल्या आणि अतिरेक्यांना पळण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा दलाने त्या भागाला वेढा घातला.रविवारी सकाळी चकमकी पुन्हा सुरू झाल्या आणि त्यात दोन अतिरेकी ठार झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. शोध मोहीम अजूनही सुरू आहे. शुक्रवारी बिजबेहरा परिसरातील गोरीवन येथील हवालदार मोहम्मद सलीम अखून याच्या घराबाहेर हत्या करण्यात या दहशतवाद्यांचा समावेश होता असल्याचे पोलिसांनी सांगितले. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, बिजबेहरा चकमकीत सैन्याच्या जवानाला ठार मारण्यासाठी जबाबदारी घेतलेल्या अतिरेकी दोन दिवसात मारले गेले.

टॅग्स :SoldierसैनिकterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस