कान्हा पार्कच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घ्या, केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:03 AM2022-04-06T07:03:04+5:302022-04-06T07:03:34+5:30
Kanha National Park: मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध कान्हा नॅशनल पार्क नक्षलींची जवळपास छावणी झाल्याचा विषय गांभीर्याने घ्या, असे पत्र केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना लिहिले आहे.
- अभिलाष खांडेकर
भोपाळ : मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध कान्हा नॅशनल पार्क नक्षलींची जवळपास छावणी झाल्याचा विषय गांभीर्याने घ्या, असे पत्र केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना लिहिले आहे. यादव म्हणाले की, “नक्षलींच्या कारवायांचा आम्ही निषेध करतो. त्याच वेळी मध्य प्रदेश सरकारने तेथील परिस्थितीचा सुरक्षा आढावा ताबडतोब घ्यावा.”
पर्यावरणवाद्यांनीही नक्षलींवर ताबडतोब कारवाई करा, अशी मागणी केली आहे. कान्हा पार्क या व्याघ्र अभयारण्याचे संरक्षण व्हावे, यासाठी ताबडतोब उपाय योजण्याचे आवाहन कान्हाचे माजी क्षेत्र संचालक डॉ.खगेश्वर नायक आणि रमेश प्रताप सिंह यांनी केले आहे. कान्हा नॅशनल पार्क नक्षलींची जवळपास छावणी झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी दिले होते. नक्षली आणि त्यांच्या वेगवेगळ्या दलमनी वनकर्मचाऱ्यांना दहशत निर्माण केली असून, वाघ आणि बिबट्यांनाही ठार मारले आहे. या पार्कच्या अंतर्गत जंगलात नक्षलींच्या गटांचे अस्तित्व असल्याला राज्य सरकारच्या गुप्तचर सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य असलेले डॉ.नायक यांनी मुख्यमंत्री चौहान यांना लिहिलेल्या पत्रात काही वर्षांपासून नक्षलींच्या कारवायांबद्दलची वृत्ते येत असतानाही सुरक्षादलांनी काही कारवाई न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. आर.पी. सिंह म्हणाले की, “भारतात उत्तम प्रकारे व्यवस्थापन झालेल्या अभयारण्यांत कान्हा पार्कचा समावेश आहे.