नवी दिल्ली : 27 वर्षापूर्वी रायसीना हिल्स भागातल्या राष्ट्रपती भवनावरून रिक्षा ओढत नेणा:या 51 वर्षाच्या कंभोज या रिक्षेवाल्याला एक दिवस आपण याच राष्ट्रपती भवनात खास निमंत्रित होऊन आदरातिथ्यासाठी जाऊ असे स्वप्नातही वाटले नव्हते, मात्र तसे घडले आहे. या रिक्षेवाल्याने एका बहुउपयोगी अन्न प्रक्रिया यंत्रची निर्मिती करून मानवजातीसाठी आरोग्य व विकासाचे एक नवे द्वार खुले करून दिले आहे.
देशातून पाच संशोधक निमंत्रितांपैकी एक असलेल्या धर्मवीरने एक अन्न प्रक्रिया यंत्र बनविले असून त्यात 2क्क् किलो टोमॅटोचा पल्प एका तासात बनविला जाऊ शकतो. तसेच आवळा, कोरफड, जांभूळ यासारख्या औषधी फळांचाही अर्क काढला जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर फुलांचा व औषधी वनस्पतींचा अर्कही त्यातून काढला जाऊ शकतो.
हे यंत्र विकसित करण्यासाठी आपल्याला 11 महिने लागल्याचे धर्मवीर सांगतात. राष्ट्रीय कल्पकता प्रतिष्ठानने आपल्या गावाला भेट देऊन या यंत्रची पाहणी केल्याचे ते म्हणाले. धर्मवीर यांचे हे यंत्र विविध वनौषधींमधून तेल व अर्क काढण्यात कामी येते. हे यंत्र 1क्क् किलो कोरफडचा अर्क एका तासात काढू शकते, तर सव्वा किलो कोरफडीच्या पानांची 1 लिटर जेल तयार करू शकते.
चित्रपटासारखी कहाणी
धर्मवीर कंभोज नावाच्या हरियाणाचा रहिवासी असलेल्या रिक्षावाल्याची ही कहाणी एखाद्या चित्रपटासारखीच आहे. धर्मवीरचे आपल्या वडिलांसोबत काही कारणांवरून भांडण झाले आणि त्याने हरियाणाच्या यमुनानगरातील आपले घर सोडून दिल्ली गाठली. जुन्या दिल्लीतील खरी बावली येथे रिक्षा चालविणो सुरू केले. रिक्षा चालवताना 1987 मध्ये झालेल्या एका अपघातामुळे त्यांना नाईलाजाने परत हरियाणातल्या आपल्या मूळ गावी जावे लागले. तेथे कित्येक महिने अंथरुणावरच खिळून राहिलेल्या धर्मवीरला आता काहीतरी वेगळे करून दाखवायचे होते. दिल्लीतल्या वास्तव्यात त्याने फळे व भाज्या अधिक काळ टिकाव्यात व त्याचा फायदा शेतक:यांना व्हावा असे त्याला मनापासून वाटत असे. मात्र खेडय़ातून आलेल्या भाज्या व फळांना दिल्लीत योग्य भाव मिळत नव्हता. त्यामुळे या फळांना व भाज्यांना टिकवणारे यंत्र बनविण्याचा ध्यास धर्मवीरने घेतला व आपले काम सुरू केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणीत रमताना धर्मवीर यांनी, जेव्हा जेव्हा मी राष्ट्रपती भवनासमोरून रिक्षा ओढत असे तेव्हा राष्ट्रपती भवनात काय असेल याचाच विचार करीत असे. आज मी येथे बसलो आहे यावर माझा विश्वासच बसत नाही.