रिक्षातून गावठी दारुची वाहतूक करणार्या दोघांना अटक
By admin | Updated: March 14, 2016 00:20 IST
जळगाव: प्रवाशी वाहतूक करणार्या रिक्षातून गावठी दारुची वाहतूक करणार्या देविदास लक्ष्मण सोनवणे (वय ५२) व नितीन मुरलीधर गरुड (दोन्ही रा.हुडको, पिंप्राळा) या दोघांना रविवारी सकाळी रामानंद नगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. दोघांकडून दारु व रिक्षा असा ३६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
रिक्षातून गावठी दारुची वाहतूक करणार्या दोघांना अटक
जळगाव: प्रवाशी वाहतूक करणार्या रिक्षातून गावठी दारुची वाहतूक करणार्या देविदास लक्ष्मण सोनवणे (वय ५२) व नितीन मुरलीधर गरुड (दोन्ही रा.हुडको, पिंप्राळा) या दोघांना रविवारी सकाळी रामानंद नगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. दोघांकडून दारु व रिक्षा असा ३६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.पिंप्राळा हुडको, हरविठ्ठल नगर, राजीव गांधी नगर आदी भागातून रिक्षाद्वारे गावठी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक शामराव पवार, महेंद्रसिंग पाटील, प्रदीप चौधरी, शरद पाटील, हितेश बागुल आदींना सापळा लावून हुडको-पिंप्राळा रस्त्यावर एम.एच.१९ व्ही.०३९० या रिक्षाला अडविण्यात आले असता त्यात गावठी दारुची कॅन आढळून आली.