रिक्षाची परस्पर विक्री चालकाची न्यायासाठी फिरफिर : पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ
By admin | Published: June 20, 2016 12:22 AM
जळगाव : फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे दोन हप्ते थकीत झाल्याने तांबापुरा भागातील शरीफ पटेल या चालकाची रिक्षा ओढून नेत तिची परस्पर विक्री केल्याचा प्रकार नुकताच झाला. याबाबत औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतरही टाळाटाळ होत असल्याने चालकाची न्यायासाठी वणवण सुरु आहे.
जळगाव : फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे दोन हप्ते थकीत झाल्याने तांबापुरा भागातील शरीफ पटेल या चालकाची रिक्षा ओढून नेत तिची परस्पर विक्री केल्याचा प्रकार नुकताच झाला. याबाबत औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतरही टाळाटाळ होत असल्याने चालकाची न्यायासाठी वणवण सुरु आहे.८० हजारात घेतली रिक्षातांबापुरातील बिलाल चौकातील रहिवासी असलेले शरीफ पटेल शहा यांनी अकबर पिंजारी यांच्यामार्फत एम.एच. १९ व्ही ८७०७ ही रिक्षा घेतली. या बदल्यात त्यांनी ८० हजार रुपये रिक्षामालकाला देऊन उर्वरित रक्कम श्रीराम सिटी फायनान्स कंपनीकडून कर्जस्वरुपात घेतली होती.४५०० हजारांच्या हप्त्याने परतफेडशरीफ पटेल यांनी प्रत्येक महिन्याला ४५०० रुपयांची परतफेड सुरु केली. त्यानुसार त्यांनी १३ हप्त्यांचा भरणा केला. व्यावसायीक अडचणींमुळे त्यांचे दोन ते तीन हप्ते थकीत झाले. त्यानंतर फायनान्स कंपनीच्या कर्मचार्यांनी ही रिक्षा ओढून नेत तिची परस्पर विक्री केल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे.एक लाख ३८ हजारांचे नुकसानरिक्षा मालक शरीफ पटेल यांनी रिक्षा खरेदी करताना ८० हजारांची रक्कम मालकाला दिली होती. त्यानंतर १३ हप्त्यांच्या स्वरुपात ५८ हजार ५०० रुपयांचा भरणा केला आहे. फायनान्स कंपनीच्या कर्मचार्यांनी रिक्षा ओढून नेल्यामुळे पटेल यांचे तब्बल एक लाख ३८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रिक्षाची परस्पर विक्री झाली तसेच एक लाख ३८ हजारांची रक्कम गेल्यानंतर पटेल यांनी फायनान्स कंपनीकडे विनवण्या सुरु केल्या. मात्र संबधितांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळआपली फसवणूक झाल्यामुळे शरीफ पटेल यांनी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला धाव घेतली. मात्र फायनान्स कंपनीचा विषय असल्याने तुम्ही बाहेरच वाद मिटवा असा सल्ला या ठिकाणी देण्यात आला. त्यामुळे पटेल यांची न्यायासाठी फिरफिर सुरु आहे.मो.परवेज नावाच्या व्यक्तिला आम्ही कर्ज दिले आहे. शरीफ पटेल हे आमचे ग्राहक नाहीत. मार्च महिन्यात आम्ही रिक्षा आणली. त्यानंतर तीन महिने त्यांची वाट पाहिली. त्यानंतर मूळ मालक मो.परवेज यांनी उर्वरित रक्कम भरल्याने त्यांना रिक्षा परत करण्यात आली.राजेंद्र पाटील, टीम लिडर, श्रीराम फायनान्स, जळगाव.