नवी दिल्ली : धुरांच्या रेषा हवेत सोडणाऱ्या रेल्वेच्या जागी आलेल्या डिझेल इंजिनसोबत विजेवर चालणाऱ्या इंजिनमुळे रेल्वेचा प्रवास सुखदायी करणारी भारतीय रेल्वे आता नव्याने कात टाकत विदेशी पर्यटकांसोबत भारतीय प्रवाशांसाठी रेल्वेप्रवास अधिक आरामदायी होणार आहे. आता रेल्वे प्रवाशांना खिडकीतून न डोकावता बसल्या जागी आकाशासोबत आजूबाजूचा निसर्ग न्याहाळण्याची पर्वणी मिळणार आहे. यासाठी भारतीय रेल्वे बिलोरी छत असलेले डबे रुळावरून दौडविण्याचा इरादा पक्का केला असून त्याच्या दृष्टीने तयारीही केली आहे. पर्यटनाला उभारी देणे, हाच भारतीय रेल्वेचा उद्देश आहे.स्वीत्झर्लंडप्रमाणे आता भारतात बिलोरी छतांच्या डब्यातून आजूबाजूचे निसर्गसौंदर्य आणि आकाशातील विहंगम दृश्य न्याहळता येणार आहे. विशेष म्हणजे हे बिलोरी छतांचे डबे अद्ययावत माहिती-मनोरंजन सुविधांनी सज्ज असतील. भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन आणि रिसर्च डिझाईन्स अॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन व इंटिग्रल कोच फॅक्टरी (पेरुम्बदूर) यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरामशीर बिल्लोरी डबे तयार करण्यात येत असून, डिसेंबर २०१६ मध्येच बिलोरी छतांच्या रेल्वे डब्यांचे (ग्लास सिलिंग कोचेस) अवतरण करण्यात येणार आहे. तथापि, हवाई निरीक्षणाची सुविधा असलेली स्पेशल ट्रेन चालविण्याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. बिलोरी डब्यांची पहिली रेल्वे सर्वप्रथम काश्मीर खोऱ्यात धावणार असून, जम्मू-काश्मीर खोऱ्यातून नियमित धावणाऱ्या रेल्वेला हा डबा जोडला जाणार आहे. तसेच अन्य दोन बिलोरी डबे आराकू खोऱ्यात (विशाखापट्टणम) धावणार आहेत. स्वीत्झर्लंडसह काही देशांत अशा डब्यांची रेल्वे पर्यटकांच्या पसंतीला उतरली आहे. भारतातही यामुळे रेल्वे पर्यटनाला नवी उभारी मिळेल, असा विश्वास आहे, असे आयआरसीटीसीचे व्यवस्थापकीय संचालक ए.के. मनोचा यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)अशी आहेत रेल्वेची वैशिष्ट्य...आरपार छताचा पहिला डबा आॅक्टोबरमध्ये तयार होणारअद्ययावत माहिती-मनोरंजन सुविधांनी सज्जआरामशीर प्रवासासाठी भरपूर मोकळी जागाचेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत उत्पादनएका डब्याचा खर्च ४ कोटी रुपये३६० कोनातून फिरणाऱ्या खुर्चीमुळे प्रवाशांना आकाश न्याहळता येईल.
रेल्वेला बसविणार आर-पार काचांचे छत; पर्यटनाला मिळणार उभारी
By admin | Published: October 12, 2016 6:05 AM