इम्फाळ : सुरक्षा दलांनी मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यात शोधमोहीम राबवून मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारूगोळा जप्त केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील शांतीपूर, खमेनलोक व वाकन भागात गुरुवारी शोधमोहीम राबविण्यात आली.
जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सागोलमांग पोलिस स्टेशनच्या सुपुर्द करण्यात आल्याचेे सुरक्षा दलांनी सांगितले. गेल्या २४ तासांत राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी गुरुवारी मणिपूर पोलिसांच्या १३२ व्या स्थापनादिनी सांगितले की, राज्यातील गणवेशधारी कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी जातीची पर्वा न करता मालमत्तेच्या रक्षणाचे काम केले पाहिजे. जे लोक स्वेच्छेने शस्त्रे पोलिसांच्या सुपुर्द करतात, त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला जाणार नाही, असेही सिंह म्हणाले.
कार स्फोट; आणखी एक आरोपी अटकेतnमणिपूर कार बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएला मोठे यश मिळाले असून, या केंद्रीय संस्थेने मणिपूर पोलिसांच्या मदतीने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. nमोहम्मद इस्लाउद्दीन खान, असे या आरोपीचे नाव आहे. गेल्या २१ जून रोजी मणिपूरच्या बिष्णुपूर मधील क्वाक्ता भागात एका वाहनात बॉम्बस्फोट झाला होता. यात तीन जण जखमी होण्यासह पूल आणि घरांचेही नुकसान झाले होते.
काय जप्त केले?३ एके ४७/५६ रायफली ४ कार्बाइन मशिन गन ७ एसएलआर १,६१५ काडतुसे८२ हातबॉम्ब ३६ शस्त्रे१३२ युद्धसामग्री