काँग्रेस पक्षश्रेष्ठी-अशोक गेहलोत यांच्यात दुरावा वाढला; सचिन पायलट यांचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 06:38 AM2021-06-24T06:38:41+5:302021-06-24T06:38:47+5:30

सचिन पायलट यांचा मुद्दा; मुख्यमंत्र्यांनी फेटाळला प्रस्ताव

The rift between Congress party supremo-Ashok Gehlot widened pdc | काँग्रेस पक्षश्रेष्ठी-अशोक गेहलोत यांच्यात दुरावा वाढला; सचिन पायलट यांचा मुद्दा

काँग्रेस पक्षश्रेष्ठी-अशोक गेहलोत यांच्यात दुरावा वाढला; सचिन पायलट यांचा मुद्दा

Next

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये निर्माण झालेला दुरावा आणखी वाढला  आहे. पायलट यांच्याशी मतभेद संपुष्टात यावेत यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिलेला प्रस्ताव गेहलोत यांनी मान्य केला नाही.

हा प्रस्ताव पक्षाध्यक्षांच्या वतीने काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी गेहलोत यांना सादर केला. पायलट समर्थकांना गेहलोत यांनी कॅबिनेट मंत्री तसेच राज्यमंत्री करावे  व सचिन पायलट यांना  पक्षाचे सरचिटणीस करण्यात येईल असे या प्रस्तावात म्हटले 
आहे.  आपल्या मागण्या पंधरा दिवसांत मान्य कराव्यात असे पायलट यांनी केंद्रीय नेतृत्वाला सांगितले आहे.

मुख्यमंत्री भूमिकेवर ठाम

सचिन पायलट व त्यांच्या समर्थकांंना कोणत्याही मोठ्या जबाबदाऱ्या सोपवू नये या भूमिकेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत ठाम आहेत. त्यांच्याशी सोनिया गांधी व राहुल गांधी हे लवकरच थेट चर्चाही करणार आहेत. पायलट आपल्या समर्थक आमदारांसह दुसऱ्या पक्षात गेले तरी आपल्या सरकारला काहीही धोका निर्माण होणार नाही व आवश्यकता भासल्यास सरकारचे बहुमत सिद्ध करू असा गेहलोत यांना विश्वास आहे.

Web Title: The rift between Congress party supremo-Ashok Gehlot widened pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.