शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

सुदृढ आरोग्य माणसाचा मूलभूत हक्क; सरकारने स्वस्तात उपचार उपलब्ध करावेत: सुप्रीम कोर्ट

By मोरेश्वर येरम | Published: December 18, 2020 6:37 PM

कोरोनाच्या 'गाइडलाइन्स'ची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचेही आदेश कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत.

ठळक मुद्देकोविड रुग्णालयांमधील अग्नी सुरक्षेबातात कोर्टाने दिले महत्वाचे आदेशनागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य सरकारची प्राथमिकता असायला हवीकोरोनाच्या जागतिक युद्धात, राज्य सरकार आणि केंद्राने समन्वयाने काम करावं; कोर्टाचा सल्ला

नवी दिल्लीसुप्रीम कोर्टाने शुक्रवारी ऐतिहासिक टिप्पणी करत सुदृढ आरोग्य हा देशातील नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचं मत नोंदवलं. 'राइट टू हेल्थ' अंतर्गत सुदृढ आरोग्य प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने स्वस्त उपचारांची व्यवस्था करायला हवी, असं महत्वपूर्ण निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे. 

कोरोनाच्या 'गाइडलाइन्स'ची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचेही आदेश कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. यासोबतच कोविड रुग्णालयात अग्नी सुरक्षेचीही काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. 

सर्व कोविड रुग्णालयांमध्ये 'फायर सेफ्टी' हवीकेंद्र आणि राज्य सरकारांना देशातील प्रत्येक कोविड सेंटरमध्ये अग्निसुरक्षेची संपूर्ण काळजी घ्यायला हवी, असं कोर्टानं म्हटलं. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या कोविड रुगणालयामध्ये आग लागल्याने रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची भयानक घटना घडली होती. या घटनेची दखल घेत कोर्टाने अग्नीसुरक्षेबाबतचे आदेश सरकारला दिले आहेत. ज्या रुग्णालयांना अद्याप अग्नीसुरक्षेचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळालेली नाही. त्यांनी ते तातडीने घ्यावे, असे  आदेश कोर्टाने दिले आहेत.

एखाद्या रुग्णालयाने येत्या ४ आठवड्यात अग्नीसुरक्षेची एनओसी न घेतल्यास अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेशही कोर्टाने राज्य सरकारांना दिले आहेत. याशिवाय, अग्नीसुरक्षेच्या मुद्द्यावरुन प्रत्येक राज्याला एक नोडल ऑफीसरची नियुक्ती करण्याची सुचना कोर्टाने दिली आहे. 

कोरोनाविरोधातील युद्ध ही 'जागतिक लढाई'कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्वं आणि मानकांचं पालन न केल्याने व्हायरस जंगलाला लागलेल्या आगीप्रमाणे वेगाने पसरला आहे. या महामारीमुळे जगातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं प्रभावित झाला आहे. हे कोविड विरोधातील जागतिक युद्ध आहे. कर्फ्यू किंवा लॉकडाउनची घोषणा करण्यापूर्वी सरकारने नागरिकांच्या उपजिविकेसाठीच्या सुविधा उपलब्ध करुन द्यायला हव्यात, असं कोर्टाने नमूद केलं. 

नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य प्राथमिकतागेल्या आठ महिन्यांपासून सततच्या कामाने देशातील आरोग्य कर्मचारी आता थकले आहेत. त्यांना आराम देता येईल यासाठीची पर्यायी व्यवस्था उभारण्याची गरज आहे. याशिवाय, राज्य सरकारांनी अतिशय काळजीपूर्वक कोणतीही कारवाई करावी आणि केंद्रासोबत समन्वय ठेवून काम केलं पाहिजे. नागरिकांची सुरक्षा आणि उत्तम आरोग्य ही सरकारची प्राथमिकता असायला हवी, असंही कोर्टानं म्हटलं आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक