नवी दिल्ली : तुम्ही उजवे आहात की डावखुरे? आपली कामे तुम्ही कोणत्या हाताने करता? अर्थात एखादी व्यक्ती उजवी आहे की, डावखुरी हे केव्हा कळते, असा प्रश्न उपस्थित झाला, तर त्याचे नवे उत्तर आता मिळाले आहे. एका संशोधनातून असे स्पष्ट झाले की, गर्भातच बाळ उजवे की डावखुरे याचा निर्णय होत असतो. आठव्या आठवड्यात याबाबतची प्रक्रिया सुरू होते. तेराव्या आठवड्यात गर्भातील बाळ उजव्या किंवा डाव्या हाताचा अंगठा तोंडात घेते. १९८० च्या दशकात अल्ट्रासाउंड स्कॅनच्या माध्यमातून याचा शोध घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. हाताच्या हालचाली या प्रामुख्याने मेंदूच्या माध्यमातून सुरू होतात. पाठीच्या कण्यासाठी यातून संदेश पाठविले जातात. त्यामुळे हालचालीचे नियंत्रण मेंदूतूनच होत असावे, असा दावा संशोधनातून करण्यात आला होता. अन्य एका संशोधनातून असा दावा करण्यात आला की, गर्भातील बाळाची हाताची हालचाल ही त्याच्या अनुवांशिकतेशीही संबंधित आहे. एकूणच काय तर बाळ उजवे आहे की, डावखुरे याचा अंदाज आपण त्याच्या जन्मानंतर बांधत असलो, तरी त्याची निश्चिती आईच्या गर्भातच झालेली असते.
उजवे की डावखुरे? गर्भातच ठरते
By admin | Published: February 21, 2017 1:04 AM