वडोदरा : कोणत्याही व्यक्तीला कुठेही मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाण्याचा हक्क आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी म्हटले आहे. जातीपातींवरून केल्या जाणाऱ्या भेदभावामुळे हिंदू समाजाची बदनामी होत आहे. हा भेदभाव नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कसून प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
- गुजरातमधील वडोदरामध्ये गुरुवारी संघाच्या मेळाव्यात होसबळे म्हणाले की, देशातील लोकांमध्ये ऐक्याची भावना रुजण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. - देशात कोणत्याही व्यक्तीला कुठेही मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा अधिकार आहे, तसेच प्रत्येकाला विहीर, तलाव अशा कोणत्याही जलसाठ्यातून पाणी घेण्याचा अधिकार आहे.