ेसामाजिक न्याय मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क
By admin | Published: February 22, 2015 12:18 AM
पुणे : सामाजिक न्याय मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. समाज हा आपल्या न्याय घटनेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सामाजिक समस्या कोणत्या आहेत, त्या समजून घेऊन, समस्यांवर उपाययोजना केल्याने निितच सामाजिक न्याय मिळू शकतो असा विश्वास सवार्ेच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. मदन लोकुर यांनी व्यक्त केले.
अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकत्याच १४ फेब्रुवारी आबेदा इनामदार सिनियर कॉलेजमध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाली. तीन भाषेसाठी झालेल्या या स्पर्धेला मराठी, हिंदी भाषेबरोबरच उर्दू भाषाही ठेवण्यात आली होती. प्रत्येक भाषेसाठी दोन जण असा सहा जणांचा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात आला. पुणे, अहमदनगर, नाशिक, मालेगाव यासारख्या शहरातून अनेक महाविद्यालयांचे संघ तिथे आले होते.अहमदनगर कॉलेजच्या संघाने उत्कृष्ट गुणसंख्येच्या आधारे ऑल महाराष्ट्र लेडी तेहिरूनिस्सा चषक जिंकला. प्रत्येक भाषेसाठी दिल्या जाणार्या वैयक्तिक बक्षीसावरही अहमदनगर कॉलेजचे वर्चस्व होते. महाविद्यालयीन निवडणुका राजकारणाचा पाया आहे व युवक आणि नैतिकता या विषयावर युवकांनी उत्कृष्टपणे भाषण केले.या स्पर्धेचे भलेही ७ वे वर्ष असले तरी सुरुवातीचे तीन वर्ष ही स्पर्धा फक्त उर्दू आणि हिंदीसाठी होती. २०१२ पासून २०१५ पर्यंत म्हणजेच चार वर्षे ही स्पर्धा तीन भाषेत सुरू झाली, हे या स्पर्धेचे मोठे वैशिष्ट्य आहे. या चार स्पर्धामध्ये २०१२ आणि २०१५ मध्ये अहमदनगर कॉलेजचे वर्चस्व राहत त्यांनी दोनदा हा चषक पटकावला. २०१३ आणि २०१४ यावर्षी पुण्याच्या इनामदार व नाशिकच्या मालेगाव कॅम्प या कॉलेजने बाजी मारली मात्र यादोन्ही वर्षी नगर कॉलेज दुसर्या क्रमांकावर होते. म्हणजेच चार वर्षात दोन विजेतेपद व दोन उपविजेतेपद जिंकत राज्य पातळीवर नगर कॉलेजने तिन्ही भाषेत आपले प्रभुत्व असल्याचे सिद्ध केले आहे. याला कारणही तसेच आहे. नगर कॉलेजमध्ये या तिन्ही भाषा संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केला जातो. डॉ.रफिया शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर कॉलेज तिन्ही भाषेत आपले योगदान देत आहे. (अपूर्ण.....)